निवडणूक पार्श्वभूमीवर नागणी येथे उभारलेल्या आंतरराज्यीय सीमेवरील तपासणी नाक्यास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची भेट
कुंडलवाडी :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुक पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंग होऊ नये, अवैध बाबींना पायबंध घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महसूल व पोलीस विभागाच्या वतीने नागणी येथे आंतरराज्यीय सीमेवर नाकाबंदी सुरू करून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी नाक्या येते २४ ऑक्टोबर रोजी ८ वाजेच्या सुमारास नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी भेट दिली आहे.
नांदेड जिल्ह्यात नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा ची सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे यासाठी १५ ऑक्टोबर पासून आचारसंहिता ही लागू करण्यात आली असून कुंडलवाडी पासून मागणी मार्गे तेलंगणाला रस्ता जातो या आंतरराज्य सीमेवर नागणी येथे कुंडलवाडी पोलिसांची पोलिसांची राहुटी उभारण्यात आली आहे. त्याठिकाणी पथकाकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याठिकाणी एएसटी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकात महसूल व पोलिस कर्मचारी सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातून तेलंगणात व तेलंगणातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची पथकाकडून कसून तपासणी तसेच व्हिडीओ शुटिंगही केली जात आहे.पथकात पथक प्रमुख व्यंकटराव रामराव इंगळे नितीन कांबळे व कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकाँ माधव पाटील खतगावकर, रघुवीर सिंह चौहान, अमरनाथ शिंदे यांच्यासह फोटोग्राफर सिद्धू सब्बनवार यांचा समावेश आहे.
दरम्यान पथकाची कुंडलवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी भेट देऊन पाहणी केली. नागणी येथील सीमेवर उभारण्यात आलेल्या आंतरराज्य तपासणी पथकाकडून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. तसेच व्हिडीओ शुटींगही करण्यात येत आहे.