तंटामुक्ती अध्यक्षपदी विनायक पाटील यांची निवड
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कार्ला – माहेगाव येथे सरपंच सौ. चंदरबाई खंडू फंताडे यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी एम. एम. शेख यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीच्या अध्यक्षपदी विनायक पाटील यांची निवड करण्यात आली.
झालेल्या ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती गाव समिती गठीत करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी अध्यक्षपदी निवड करण्याबाबत दोन तीन नावे आली होती पण महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष म्हणून विनायक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विनायक पाटील हे अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत.
विनायक पाटील छावा संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होतात. एक नवतरुण, सर्वांच्या सुख – दुःखात धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून विनायक पाटील यांची ओळख आहे. आणि याच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
या ग्रामसभेस प्रेमकुमार पोलीस पाटील, नामदेव निलेवाड पोलीस पाटील, पांडुरंग पा.वडजे, सिद्राम व्हनशेटे उपसरपंच, नामदेव कांबळे मा.पं.स.सदस्य, व्यँकट अमोघे, दत्ता अमोघे, रामदास पा. वडजे, राजेश वडजे, भगवान कार्लेकर, मारोती पंडिलवाड, विजय कार्लेकर, साहेबराव अमोघे, प्रकाश जोंधले, संतोष अमोघे, सचिन सोनकांबळे, कामाजी अमोघे, बाळू सुरणर, श्रवण कार्लेकर यासह गावातील नागरिक उपस्थित होते. विनायक पाटील यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.