89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

नायगाव विधानसभेसाठी पुनम पवार यांच्यासह तिघांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : उमेदवारी दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत ५६ उमेदवारांनी ९७ नामनिर्देशन पत्र खरेदी केले. भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पुनम पवार यांच्यासह तिघांनी उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ आहे.

निवडणूक लढवण्यासाठी ५६ उमेदवारांनी ९७ नामनिर्देशन पत्र खरेदी केल्याने नायगाव विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारांची भाऊगर्दी होणार असल्याचे दिसत आहे. मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर हि चौथी निवडणूक आहे. यापुर्वी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांनी २००९ मध्ये अपक्ष तर २०१४ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवली आणि जिंकली.

पहील्यांदा स्व. बापूसाहेब गोरठेकर तर दुसऱ्यांदा विद्यमान आ. राजेश पवार यांचा पराभव केला होता. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राजेश पवार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली यावेळी त्यांनी ५४,३८४ एवढे मताधिक्य घेवून वसंतराव चव्हाण यांचा पराभव केला.

यंदा होणारी निवडणूक ही चौथी निवडणूक असून काँग्रेसने डॉ. मिनल खतगावकर यांना तर भाजपने पुन्हा एकदा आ. राजेश पवार यांना तर वंचित आघाडीने डॉ. माधव विभूते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रमुख पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी अद्यापही प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला नाही.

परंतु विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या पत्नी व भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा पुनम पवार यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर अपक्ष म्हणून गजानन शंकरराव चव्हाण यांनी तर भाजपच्या नावावर उमरी येथील गजानन तानाजीराव श्रीरामवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शुक्रवारी दि.२५ पर्यंत ५६ उमेदवारांनी ९७ अर्ज खरेदी केले आहेत. चार दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्जाची विक्री झाल्याने उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात असणार असल्याचे संकेत आतापासूनच दिसून येत असून. पुढील दोन दिवसात सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker