ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थ येथील संवेदनशील मतदान केंद्राची निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून पाहणी

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ तालुका बिलोली येथील मतदान केंद्र संवेदनशील असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकिच्या अनुषंगाने येथील मतदान केंद्राची दि.26 ऑक्टोंबर रोजी दुपारी तिनच्या सुमारास बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी पहाणी केले.
नांदेड लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या वेळी रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतदान चालू असताना एका सुशिक्षित तरुण बेरोजगार युवकाने मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनच फोडले असल्याने हा विषय संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा झाला होता यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संवेदनशील असलेल्या रामतीर्थ तालुका बिलोली येथील मतदान केंद्राची पाहणी 90 बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून असलेल्या उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे यांनी मतदान केंद्राची पाहणी केले यावेळी रामतीर्थ सज्जाचे तलाठी विजय पाटील जाधव,रामतीर्थ नगरीचे सरपंच प्रतीनिधी राजेंद्र पाटील तोडे, पत्रकार हनमंत पाटील वाडेकर आदिसह अन्य नागरिक उपस्थित होते.
रामतीर्थ तालुका बिलोली येथे यापूर्वी तीन मतदान केंद्रावर मतदान होत होते परंतु यावर्षी मतदारांची संख्या कमी झाल्याच्या कारणावरून येतील मतदान केंद्र हे एक कमी होऊन आता दोनच मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार असल्याची माहिती रामतीर्थ सज्जाचे तलाठी विजय पाटील जाधव यांनी यावेळी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker