89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

राजेश पवार व कमळाबाईचा सुफडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – होटाळकर

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : मतदार संघातील समर्थक, चाहते, मित्रमंडळी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी शिवराज होटाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी दिपावली स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्यांनी आमदार राजेश पवार यांच्यावर जोरदार पलटवार केला. टोकदार शब्दात समाचार घेताना होटाळकरांनी कुठल्याही परिस्थितीत राजेश पवारांचा व त्यांच्या कमळाबाईचा सुफडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार केला आहे.

भाजपाचा राजीनामा देवून नायगाव मतदार संघात अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करणारे शिवराज होटाळकर यांनी अखेरच्या क्षणी मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार उमेदवारी दाखल केली होती. परंतु जरांगे पाटलांनी उमेदवारी न देण्याचा निर्णय जाहीर केला व ज्यांनी ज्यांनी उमेदवारी दाखल केली होती त्या त्या उमेदवारांनी झालेल्या निर्णयानुसार होटाळकरांनी मनोज जरांगे यांचा आदेश व समाजाची भावना लक्षात घेवून आपली उमेदवारी मागे घेतली.

होटाळकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर धास्तावलेले राजेश पवार व त्यांच्या पत्नी पुनम पवार यांनी (ता.२९) आक्टोबर रोजीच्या जाहीर सभेत शिवराज होटाळकर यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टिका केली. त्याचबरोबर त्यांना उचकावण्याचा प्रयत्न केला. मात्र होटाळकरांनी संयम दाखवत आठ दिवसानंतर पवार पती-पत्नीचा चांगलाच समाचार घेतला. काल (ता.७) रोजी सायंकाळी त्यांच्या भारत जिनिंगमध्ये मतदार संघातील आपल्या चाहत्यांचा व समर्थकांचा दिपावली निमित्ताने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी त्यांनी राजेश पवारांच्या विरोधात राजकीय फटकेबाजी केली.

राजेश पवारांनी केलेल्या आरोपींना होटाळकरांनी सडेतोड उतर तर दिलेच पण एक कोटी खाले असल्याच्या आरोपावर बोलताना त्यांनी मी आलूवडगावच्या मंदिरावर एक कोटी ठेवतो त्यांनी हनुमानाली साक्षी ठेवून रक्कम घेवून जावी असे आव्हान दिले. मागच्या पाच वर्षात या आमदाराने खुपच त्रास दिलाय ना सरपंचाचा मान ठेवला ना कार्यकर्त्यांना बळ दिले. उलट मराठा व लिंगायत समाजाच्या तरुणावर गुन्हे दाखल केले. त्यामुळे लिंगायत समाज एकत्र येवून राजेश पवारांच्या विरोधात भुमिका घेत आहे तर आपल्यालाही विचार करण्याची गरज आहे असे आवर्जून सांगितले.

बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राजेश पवारांच्या बुध्दीची किव येते असे सुनावताना त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामावर बोलले पाहीजे पण तसे न करता माझ्यावर आरोप करतात असे सांगून होटाळकरांनी आता कमळाबाईच्या प्रेमात पडायच नाही. त्यामुळे राजेश पवार व कमळाबाईचा सुपडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

राजेश पवार यांच्या बाबतीत धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी आठ दिवसात भव्य जाहीर सभा घेवून आमच्या समाजासाठी व मागण्यांसाठी जो शब्द देईल वेळोवेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ राहील त्यांना मत देण्याचा आपण निर्णय घेणार आहोत पण राजेश पवार यांना आता संधी नसल्याचे होटाळकरांनी ठणकावून सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker