1998-99 वर्गमित्र च्या वतीने शिक्षक व देशसेवेवर काम करणाऱ्या वर्गमित्राचा सन्मान

किरण हणमंते
नायगाव :- तालुक्यातील बरबडा येथिल जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बरबडा येथिल शैक्षणिक वर्ष 1998-1999 मधील इयत्ता दहावी च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन [गेट टुगेदर] कार्यक्रमाचे आयोजन दि. 04/11/2024 रोजी नक्षत्र बँकेट हॉल् छत्रपती चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. या स्नेहमिलनाचा उद्देश होता जुन्या आठवणींना उजाळा देणे, शालेय जीवनातील सोबत्यांशी पुन्हा एकदा भेट घडवणे आणि आपल्या जीवनात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे तसेच सर्व वर्गमित्रांचे सुख दुःख विचारून त्यात सहभागी होण हा सुद्धा होय.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा माजी प्राचार्य व्हि.टी.सुरेवाड तर प्रमुख पाहुणे जवाहरलाल शिक्षण समिती चे अध्यक्ष दिलिपराव धर्माधिकारी, डि.सी.रेगुडे, डी.एस.कहाळेकर, यु.एस.केंद्रे, एस.एस.गोंड, आर.सी.नलबलवार, जि.जि.नागरगोजे, एन.के.आक्कलवाड, बी.आर.काचावर इत्यादी व्यासपीठावरील मान्यवारांच्या हस्ते विद्येची देवता सावित्रीबाई फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्रा.आलेवाड, प्रा.सोळंके, प्रा.तगडपल्लेवार, प्रा. बरगळ, प्रा.सोनकांबळे, प्रा.शिंदे, प्रा.हिवराळे, दिलिपराव सर्जे, पठाण गुरुजी, यशवंत कोलते, गणेश बडूरे, सुर्यकांत फड, राजेश भुसलवाड, संतोष पचलिंग, बापुराव बडूरे, काचावर बि.आर, एन.एम.तिप्पलवाड, आदी गुरुजन वर्गाची उपस्थिती होती.
त्यानंतर जे गुरु व वर्गमित्र आपल्यातून निघून गेले अशाना दोन मिनिट श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या सर्व मान्यवारांचा शिक्षकांचा सत्कार सर्व वर्ग मित्र मैत्रिणी यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्हे देऊन गौरव करण्यात आला. सदरील स्नेहमिलन कार्यक्रमात विविध क्रियाकलाचा समावेश होता. जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त करत भारावून गेले होते. काहींनी जुन्या आठवणी सांगून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शाळेतील शिक्षकांनी देखील आपल्या जुन्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांना आणखी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचा मान राखत त्यांना शाळेतून घेतलेली शिकवण आणि मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. याठिकाणी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप व्यंकटराव सुरेवाड यांनी करत आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.गजानन सुरेवाड आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन सहशिक्षक एन.एम.तिप्पलवाड यांनी तर आभार प्रा.सुरेखा भोसले यांनी केले. नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणानंतर काही वर्ग मित्रांनी गप्पा गोष्टी व मनोरंजन करत आपला सर्वांचा अल्प परिचय करून दिला आहे.
देशसीमेवर काम करणारे सैनिक बालाजी सूर्यतळ, पांडुरंग पुपलवाड, विठ्ठल शिंदे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तसेच उच्च पदावर काम करत उल्लेखनीय काम करत या गावाचे व शाळेचे नाव रोषण करत महाराष्ट्र ते दिल्लीपर्यंत आपल्या कामाची छाप पाडत वेगवेगळे पारितोषिक मिळविल्याबदल सहयोग कॅम्प येथील प्रा.डॉ. सोमनाथ पचलिंग व मुख्याध्यापक पेंटू मैसनवाड यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे. या दोघांनीही आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.