89 नायगाव विधानसभाताज्या बातम्यानांदेड

माझ्या गावात येवून माझ्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांच्या बुध्दीची किव येते

आ.पवार व त्यांच्या पत्नीबद्दल कवळे गुरुजींनी व्यक्त केला संताप

प्रल्हाद हिवराळे

उमरी : मतदार संघात उद्योग उभारुन हजारो तरुणांच्या हाताला काम देत असल्याची दखल पंतप्रधानांनी घेवून माझे कौतुक केले. मात्र आमच्याच पक्षाचे उमेदवार माझ्या गावात येवून माझ्याबद्दलच उलटसुलट व आक्षेपार्ह वक्तव्य करुन गेले. त्यांच्या बुद्धीची किव येते असा संताप व्यक्त करुन मारोतराव कवळे यांनी आ. राजेश पवार व त्यांच्या पत्नी पुनम पवार यांच्याबद्दलची खदखदत व्यक्त केली.

उमरी तालुक्यातील कुसूमनगर वाघलवाडा साखर कारखान्यांच्या बॉयलर अग्रिप्रदिपन व गव्हाण पुजनाचा कार्यक्रम दि. १० रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महंत स्वामी व्यंकटाचार्य गुरूस्वामी लक्ष्मणाचार्य बालाजी मंदिर गाडीपूरा नांदेड, विश्वहिंदू परिषदेचे कृष्णाजी देशमुख अर्धापूरकर, भाजपाचे नेते श्रावण पाटील भिलवंडे, बालाजीराव बच्चेवार, माणिकराव लोहगावे, श्रीराम पाटील जगदंबे, दत्ताहरी चोळाखेकर, बापुराव करकाळेकर, संदिप कवळे, परमेश्वर कवळे आदि उपस्थित होते.

लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधानासमोर बोलण्याची संधी मिळाली. मारोतराव कवळे यांनी मी आपल्या प्रेरणेने शेतकऱ्यांचे पाचपट उत्पन्न वाढवले तर ५ हजार बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले आहे असे पंतप्रधानांना सांगितले. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. मला दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले, रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून फोन आला याचा मला खुप आनंद झाला.

मी ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करतो, शेतमजूराला काम देत आहे बेरोजगारांना रोजगार दिला या भागातील व्यापारपेठ वाढविण्याचे काम करत हे पाहून देशाच्या पंतप्रधानांना कौतुक वाटते पण माझ्याच पक्षातील काहीना मी केलेले काम योग्य वाटत नाही. ते माझ्याच गावात येवून माझ्याबद्दल उलटसुलट व आक्षेपार्ह वक्तव्य करुन गेले. असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या बुध्दीची किव येते असा संताप यावेळी कवळे गुरुजी यांनी व्यक्त करुन आ. राजेश पवार व त्यांच्या पत्नीबद्दल मनातील खदखदत व्यक्त केली.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी कवळे गुरुजी यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. कवळे गुरुजींच्या उद्योग समुहाने यंदा साडेसात लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

राजेश पवारांच्या पत्नी सिंधी या गावात जावून कवळे गुरुजीबद्दल नको ते बोलून गेल्या तरीही मनाचा मोठेपणा दाखवत कवळे गुरुवारी यांनी लोकसभेसाठी संतुकराव हंबर्डे व विधानसभेला राजेश पवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker