जातीयवादी भाजप उमेदवाराच्या पराभवासाठी काँग्रेसच्या डॉ.मिनल खतगावकरांना पाठींबा – डॉ.भगवान मनुरकर

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर जातीयवादी भाजप उमेदवाराचा पराभव करण्यासाठी माझी अपक्ष उमेदवारी मागे घेवून काँग्रेसच्या डॉ. मिनल खतगावकरांना पाठींबा देत आहे. दि. 14 ला राहूल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती अपक्ष उमेदवार भगवान मनूरकर यांनी सांगितले.

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा जिल्हा शेतकरी जन आंदोलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ.भगवान मनुरकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक वर्षांपासून काम करणारे डॉ.मनुरकर यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळावी असे वाटत होते पण डॉ. मिनल खतगावकरांना उमेदवारी जाहीर झाली. परिणामी मनुरकर यांची अपक्ष उमेदवारी कायम राहीली. आपल्या उमेदवारीमुळे जातीयवादी पक्षांचा फायदा होवू नये यासाठी डॉ. मनुरकर यांनी उमेदवारी मागे घेवून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
नायगाव मतदार संघात कुठलीही परिस्थितीत जातीयवादी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा पराभव झाला पाहिजे यासाठी यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी झालेल्या सखोल चर्चेनंतर डॉ. मिनल खतगावकर यांना पाठींबा देण्याचा निर्णय त्यांनी राहुल गांधी यांच्या नावाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. गावातील विकासाचे प्रश्न सुटण्याबरोबरच मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभूत करणे काळाची गरज असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
मी डॉ.भगवान मनुरकर (निशाणी शिलाई मशिन) दि. १४ नोव्हेबर २०२४ रोजी काँग्रेस नेते श्री राहुलजी गांधी यांच्या जाहिर समेत पक्षप्रवेश करून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. मिनलताई खतगावकर यांना बिनशर्त पाठींबा देत आहे. करिता माझे स्नेही, मित्र, कार्यकर्ते शेतकरी बंधु भगिनी व पत्रकार मित्र यांनी मला मतदान न करता डॉ. मिनलताई खतगावकर यांची निशानी पंजा समोरील बटन दाबून त्यांना बहुमतानी विजयी करावे हि नम्र विनंती.