ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गुरुवारी नांदेड येथे राहूल गांधी यांची जाहीर सभा

प्रकाश महिपाळे

नायगाव : लोकसभा पोटनिवडणूक व जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ नांदेड येथे काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांची जाहीर सभा गुरुवारी दि. 14 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजप उमेदवारांच्या पुढे तगडे आवाहन निर्माण केले आहे. लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण, नायगाव विधानसभेच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर, नांदेड दक्षिण मोहनराव हंबर्डे, नांदेड उत्तर अब्दूल, मुखेड हनमंतराव बेटमोगरेकर, बिलोली निवृती कांबळे आणि भोकर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार पप्पू कोंडेकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील नवा मोंढा मैदानात काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवारी दि. 14 रोजी सकाळी दोन वाजता होणाऱ्या या सभेला जिल्ह्यातील मतदारानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker