
प्रल्हाद हिवराळे
उमरी : मागील पाच वर्षात आमदार राजेश पवार यांनी कार्यकर्त्यांना मोठ करण्याऐवजी ठेकेदारांना मोठे केले आहे. त्यामुळे धर्माबाद, भोकर, नांदेड, मांजरम व देगलूर तालुक्यातील ठेकेदार मतदार संघात उतरले असून. भाजपाला मतदान करण्यासाठी गावोगावी आपले विशेष दुत पाठवून मतदारांना विविध अमिषे दाखवण्यात येत असल्याची उमरी तालुक्यात चर्चा होत आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मागच्या पाच वर्षात आ.राजेश पवार यांनी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली असल्याने सहा महिण्यातच दर्जेदार कामाचा फुगा फुटला असून. यात मतदार संघाच्या विकासाऐवजी ठेकेदारांचाच प्रचंड विकास झाला आहे. शासकीय पैशावर ताव मारुन गब्बर झालेल्या ठेकेदारांनी आता राजेश पवार यांच्या विजयासाठी सरसावले आहेत.
काँग्रेसच्या उमेदवार डॉ.मिनल खतगावकर यांनी आपल्या मुद्देसुद आणि संयमित प्रचाराने मतदार संघात एक वादळ निर्माण केले आहे त्यामुळे त्यांना मतदारांचाही प्रचंड प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. डॉ.मिनल खतगावकरांच्या झंझावातामुळे राजेश पवारांच्या पायाखालची वाळू घसरत आहे.
मतदार संघातील ‘डँमेज कंट्रोल’ करण्यासाठी धर्माबाद, भोकर, नांदेड, मांजरम व देगलूर तालुक्यातील ठेकेदारांनाच मैदानात उतरवण्यात आले आहे. शासकीय निधी घशात घालून गब्बर झालेले ठेकेदार भाजपच्या प्रचार यंत्रणेत सहभागी होवून गावोगावी आपले खास दुत तर पाठवतच आहेत पण मतदारांना अमिषही दाखवण्यात येत असल्याची दबक्या आवाजात उमरी तालुक्यात चर्चा होत आहे.