क्राईमताज्या बातम्यानायगांव

बिजूर शिवारात अनोळखी इसमाचे प्रेत सापडले

लक्ष्मण बरगे

नायगाव :- बिलोली तालुक्यातील बिजुर शिवारात अनोळखी पुरुषाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडले असुन प्रेताची दुर्गंधी पसरल्याने जागेवर शवविच्छेदन करून रामतीर्थ पोलीसांना प्रेतावर जाग्यावरच अंत्यसंस्कार करावे लागले .

दि 09/06/ 2024 रोजी बिजुर गावातील महीला अजनी रोडवरून शेताकडे जात होते. त्यांना रस्त्यात दुर्गंधी येत असलेले प्रेत दिसले. सदर घटना येथील पोलीस पाटील शिवराज शिनगारे यांना कळविण्यात आले. पोलीस पाटलांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याचे स.पो.नि.श्रीधर जगताप यांना कळविले माहीती मिळताच स.पो.नि.जगताप, फौजदार नरवाडे , पो.जमदार, शिवशंकर शिंदे यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा केले प्रेताच्या अंगावर बदामी रंगाचे पॅन्ट होते अंगात शर्ट नव्हता सदर प्रेताचे वय ४०ते ४५ वर्ष, उंची १६७ ईच होती . सदर व्यक्ती वेडसर असल्याचा अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे.

प्रेताची दुर्गंधी येऊ लागल्याने पोलीसांनी रामतीर्थ येथील वैधकिय अधिकारी बोरसे यांना घटनास्थळावर बोलावून प्रेताचे शवविच्छेदन केले व अंत्यसंस्कार ही जाग्यावरच करण्यात आले सदर वर्णाचे इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास किंवा मिसिंग असल्यास रामतीर्थ पोलीस ठाण्याशी संपर्क करावे असे आवाहन रामतीर्थ पोलीसांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker