ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांचा कर्मचारी युनियनतर्फे भव्य सत्कार

जयवर्धन भोसीकर

नांदेड : जिल्हा परिषद नांदेडचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक श्री. महेश पाटील साहेब यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करून अभिनंदन करण्यात आले, तसेच पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

हा सत्कार समारंभ युनियनचे राज्याध्यक्ष श्री. बाबुराव पुजरवाड (मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी राज्याध्यक्ष पुजरवाड मामा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील साहेबांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांची व युनियनच्या पदाधिकाऱ्यांची सत्कारमूर्तींशी ओळख करून दिली.

याप्रसंगी जिल्हा शाखा नांदेडचे अध्यक्ष धनंजय गुम्मलवार, सचिव राघवेंद्र मदनुरकर आणि कोषाध्यक्ष सचिन चौदंते यांच्यासह संघटनेचे सक्रिय पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालाजी महाजन, संतोष मठपती, पवन तलवारे, रणजीत गजभारे, बालाजी नागमवाड, अभय नलावडे, अशोक मोकले, शुभम तेलेवार, रवींन रेड्डी, खाजा मोहीयोद्दीन, जितेंद्र तोटलवार, किशोर जाधव, दीपक महालिंगे, गणेश आंबेकर, विजय वाघमारे, प्रल्हाद थोरवटे, प्रदीप परोडवाड, शिवसांब चेडू, तुतुरवाड, जगदीश बोडके, बद्रीनाथ मुदलियार, प्रमोद गायकवाड, गोविंद गज्जेवार, पाटणुरकर, मुक्तेश्वर चिवडे, बालाजी आवर्दे, बालाजी फोले, सुवर्णकार, शर्मा, शंकर पापुलवार, रामदास शेकापुरे, राजू केंद्रे, रामेश्वर बेळगे, किशोर खिल्लारे, जवळेकर, हरी वडजे, मोळके, मिरगे, देवणे, गोविंद मुंडे, नवाज चौधरी, आशुतोष शिंदे, अजिंक्य गोणारकर आणि पंकज दमकोंडवार आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी भगिनींनी देखील मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यामध्ये श्रीमती छाया कांबळे, गंगावणी आळंदीकर, उज्वला गजभारे, प्रेमला चौदंते, इंदुमती वाघमारे, राधा सर्जे, पतंगे, नाईकवाडे, क्षीरसागर, बलजीत चव्हाण, पापुलवार, वसुंधरा थोटे, धम्मशीला होंडाळकर, गीता हाडे, ज्योती शिळवणे, सुजाता चिद्रावार, श्रावणी कैलवाड यांच्यासह अनेक कर्मचारी बांधव व भगिनी उपस्थित होते.

या स्वागत सत्कारामुळे जिल्हा परिषद वर्तुळात नूतन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker