ताज्या बातम्यानांदेडनायगांव

पोलीस जोमात तर महसूल यंत्रणा कोमात… येळी येथे अवैध वाळू उपसा करणारे आडीच कोटीचे साहित्य जप्त

13 इसमाविरुध्द गुन्हे नोंद

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : एकीकडे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या माफीयाला अभय देण्याची भुमिका महसूल प्रशासन घेत आहे तर दुसरीकडे पोलीस यंत्रणे धाडसी कारवाया करुन तस्करांचे कंबरडे मोडण्याची मोहीम राबवताना दिसत आहेत. रविवारी येळी येथील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा करतांना उस्माननगर पोलिसांनी दोन लोखंडी बोटी, दोन जेसीबी, आठ टिप्पर असा दोन कोटी 48 लाखाचा मुद्देमाल तर जप्त केलाच पण तब्बल 8 चालकासह 5 इतरावरही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवैध वाळू व मुरुमाचा विषय ऐरणीवर आला त्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे परंतु हप्तेखोर महसूल विभागाची यंत्रणा अद्यापही सुस्तच दिसत आहे. विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने जिल्हाभर पथके स्थापन केली आहेत पण ही पथके कागदावर असून महसूलचे अधिकारी अवैध मुरुम व वाळूतून मिळणाऱ्या मलीद्यावरुन तु तु मै मै करत असल्याचे विदारक चित्र बिलोली उपविभागात निर्माण झाले आहे.

अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभाग बघ्यांची भुमिका घेत असल्याने पोलीस यंत्रणा धाडसी कारवाया करताना दिसत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उस्माननगर पोलिसांनी रविवारी दुपारी येळी येथील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा अवैध उपसा करणाऱ्यांच्या विरोधात धाडसी कारवाई केली.

यात दोन लोखंडी बोट अंदाजे एकुण किंमत 20,00,000, चार टिप्पर अंदाजे एकुण किमत 48,00,000, त्यापैकी टिप्पर क्र. एमएच-26/एडी-4414 मध्ये तीन ब्रास रेती अंदाजे किंमत 13,000 एक टाटा हिताची इएक्स-210 कंपणीचे जेसीबी मशीन किंमत अंदाजे 50,00,000 एक टाटा हिताची इएक्स 70 कंपणीचे जेसीबी मशीन किंमत अंदाजे 50,00,000 चार हायवा टिप्पर अंदाजे एकूण किंमत 80,00,000 असा एकूण 2,48,13,000 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे राजु कोंडीबा पाकलवाड, वय 32 वर्षे, व्यवसाय चालक रा.वाघाळा, ता.उमरी जि.नांदेड, माधव धसाडे, वय 31 वर्षे, व्यवसाय चालक रा.कौडगांव ता.उमरी, सचिन हरिचंद्र जाधव, वय 30 वर्षे, व्यवसाय चालक रा.सातेगाव ता.नायगांव, दत्ताहरी लक्ष्मण कंधारे, वय 27 वर्षे, व्यवसाय चालक रा.रावधानोरा ता. उमरी, माधव पिराजी झींजोरे, वय 30 वर्षे, व्यवसाय चालक रा.बळेगाव ता. उमरी, श्रावण केरबा शिरोळे, वय 48 वर्षे, व्यवसाय चालक रा.बारूळ ता. कंधार, शहाजी मोहनराव सावंत, वय 27 वर्षे, व्यवसाय चालक रा.हातणी ता. उमरी, नागेश्वर दिगांबर वाघमारे, वय 22 वर्षे, व्यवसाय चालक रा. भायेगाव ता. उमरी व इतर पाच अनोळखी इसमाविरुध्द गुन्हे नोंद केले आहेत.

महसूल विभागापेक्षा पोलीस यंत्रणा मैदानात उतरून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या विरोधात धडाकेबाज कारवाई करत असल्याने महसूल विभाग काय करत आहे असा प्रश्न पडला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker