ताज्या बातम्यानांदेडनायगांव

बसमध्ये चडत असताना महिलेचे ५६ हजारांचे मंगळसुत्र चोरले : नरसी बसस्थानकातील घटन

प्रकाश महिपाळे

नायगाव : रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरसी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना सम्रताबाई विश्र्वनाथ भालेराव या महिलेच्या गळ्यातील ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी दि.२९ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सदर महीलेनी रामतीर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केले आहे.

सध्या लग्न सराई सुरु झाल्यामुळे महामंडळाच्या बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी तर झाली च आहे पण नरसी बसस्थानकात नांदेड, बिलोली, मुखेड व देगलूर आणि तेलंगणातील बसेस येतात. त्यामुळे येथे नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. ही संधी साधून पाकीटमार व मंगळसूत्र चोरट्यांनी नरसी बसस्थानकात आपले बस्तान मांडले आहे.

त्यामुळे या बसस्थानकात पोलीसांचा बंदोबस्त असणे आवश्यक असताना रामतीर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी मलिद्याकडे लक्ष देत असल्याने चोरट्यांनी आपले हात साफ करु घेत आहेत. रामतीर्थ ठाण्यातील मलिदा गँग कुठे काय मिळते याकडे लक्ष केंद्रित करत असल्याने नरसी बसस्थानकात प्रवाश्याचे अर्थिक नुकसान होत आहे.

रामतीर्थ ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथील सम्रताबाई विश्र्वनाथ भालेराव (५५ ) यांचे नरसी बसमध्ये चढत असताना ५६ हजाराचे ७ ग्रँम वजनाचे मनी व मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले.

या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी नरसी चौकीत गेलेल्या त्या महिलेला कुणीही प्रतिसाद दिला नाही मात्र शेवटी रामतीर्थ पोलीस ठाण्यात जावून तक्रार द्यावी लागली आहे. रामतीर्थ पोलिसांनी केवळ गुन्हा नोंदवून घेतला यापलिकडे काहीही तपास झाला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker