ताज्या बातम्यानांदेडनायगांव

महापरिनिर्वाण दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच च्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

New Bharat Times नेटवर्क

नायगाव :- भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने नरसी तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथे फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आले.

प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला डॉ.धम्मप्रिया गायकवाड तहसीलदार नायगाव यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित खा.रवींद्र पाटील चव्हाण यांची उपस्थिती होती. तर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे साह्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, भास्कर भेदेकर फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच संस्थापक अध्यक्ष, नरसी येथील सरपंच गजानन भिलवंडे, डॉ.शिवाजी काकडे, डॉ संतोष मोरे, इब्राहिम बेग पटेल पोलीस पाटील, गंगाधर भेदे, देविदास सूर्यवंशी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला फुले शाहू आंबेडकर क्रांती मंचावतीने भारतीय संविधान भेट देण्यात आले. व महापुरुषांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच हे सामाजिक संघटन हे गेल्या पाच वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करून अशक्त व्यक्तीला सशक्त करण्याचं काम करत आहे. अशी भावना डॉ.धम्मप्रिया गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच चे नागसेन जिगळेकर, सुनील कांबळे, इंद्रजीत डुमणे, किरण इंगळे, सूर्यकांत भेदे ,शेख मुस्तफा पटेल, संदीप उंबरे, संदीप सोनकांबळे, दीपक कांबळे, बबलू भेदे, सचिन भेदे, गौसभाई शेख, मुनेश्वर सोनकांबळे, खाजाभाई शेख, बाबू भेदेकर यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंद्रजीत डुमणे यांनी केले. तर आभार नागसेन जिगळेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker