ताज्या बातम्यानांदेडनायगांव

दिड महिन्यांपूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेच्या पोटात पाच महिन्याचे बाळ

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे टाकळी येथील गरोदर अवस्थेत असलेल्या महिलेची तपासणी न करताच तिचे दिड महिन्यापूर्वी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या महिलेच्या पोटात पाच महिन्याचे बाळ असल्याचे दिसून आल्याने आपले पितळ उघडे पडू नये यासाठी सदरील महिलेच्या पोटात वाढणारे बाळ खाली करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी गुप्तता पाळून प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

शंकरनगर ( रामतीर्थ) तालुका बिलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरील महिलेने 15 ऑक्टोंबर 2024 रोजी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर ती पोटाची खळगी भरण्यासाठी म्हणून कामासाठी पुण्याला गेली असता तेथे तिच्या पोटात त्रास होऊ लागल्याने ती तेथील रुग्णालयात दि.4 डिसेंबर 2024 रोजी तपासणी केली असता तिच्या पोटात बाळ वाढत असून तुमच्या जीविताला धोका आहे असे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने सदरील महिलेच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असल्याने पायातील जोडवी विकुन पाच डिसेंबर रोजी त्यांनी शंकरनगर प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.

सदरील महिलाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती डोंगरे मॅडम यांची भेट घेऊन त्यांना पोटात वाढणारे बाळ आणि होणारा त्रास यासंबंधीची सविस्तर माहिती दिली असता त्यांना अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र हे प्रकरण आपल्या अंगलट येऊ शकते असे वाटल्याने कि काय दि.6 डिसेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकारी गणपत वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित महिलेसोबत तब्बल तीन तास चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे ठरले.

रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या चुकीमुळे एका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या पोटात बाळ असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरलेली असताना रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती डोंगरे मॅडम यांनी सदरील महिलेच्या पोटात वाढणारे बाळ खाली करण्यासाठी दि.7 डिसेंबर रोजी घेऊन गेले असल्याची शंकरनगर परीसरात चर्चा असून शासनाने गर्भपात करण्यास बंदी टाकलेली असताना शासकीय अधिकाऱ्याकडूनच सदरील महिलेचा गर्भपात करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker