पिंपळगाव (कुं) येथे अवैध गुटखा पकडला
कुंडलवाडी :- राज्यात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील कुंडलवाडी शहर व परिसरात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. पिंपळगाव(कुं) येथे गुटखा विक्री होत असल्याची माहीती कुंंडलवाडी पोलीसांना मिळाल्यावरून पोलीसांच्या पथकाने धाड टाकुन २१ हजार ७४६ रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला हा मुद्देमाल कुंडलवाडी पोलिसांनी जप्त करून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई दि.७ डिसेंबर रोजी सांयकाळी ६:३० वाजता केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव(कुं) येथे महमद हैदरसाब शेख हे तंबाखु व विमल पान मसाला हा मानवी शरीरास अपायकारक व हानिकारक असल्याचे व राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहीत असूनही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरटी विक्री करीत असल्याची माहिती कुंडलवाडी पोलीसांना मिळाल्यावरून सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, पोहेकाँ शंकर चव्हाण, पोहेकाँ अरूणा श्रीवास्तव, होमगार्ड सुनील चिगळे यांच्या पथकाने पिंपळगाव (कुं) येथे महमद शेख यांच्या घरी धाड मारून २१ हजार ७४६ रूपयांचा गुटखा व तंबाखूजन्य सुंगधित पदार्थ असा मुद्देमाल शासकीय पंचासमक्ष जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महमद शेख यांच्याविरुद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गु.र.न.२०१/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १२३,२७४,२७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो.नि भागवत नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ शंकर चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. आरोपीस नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती कुंडलवाडी पोलिसांनी दिली आहे.