ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून “पाकीट” प्रथम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेमध्ये मुंबई-१ केंद्रातून पोलीस पत्नी एकता मंच, मुंबई या संस्थेच्या “पाकीट” या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच धाकूशेठ पाडा सेवा मंडळ, मुंबई या संस्थेच्या “लिअर ने जगावं कि मरावं ?” या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी ९ डिसेंबर रोजी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-१ केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे:-
गोदरेज ॲण्ड बॉयज श्रमिक संघ, मुंबई या संस्थेच्या ‘मेला तो शेवटचा होता’ या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक योगेश कदम (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक अभिमान अजित (नाटक- पाकीट), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक श्याम चव्हाण (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), द्वितीय पारितोषिक संजय तोडणकर (नाटक- ती रात्र).

नेपथ्य : प्रथम पारितोषिक रोहन रहाटे (नाटक- पाकीट), द्वितीय पारितोषिक विलास गायकवाड (नाटक- द इंटरव्ह्यु), रंगभूषा : प्रथम पारितोषिक अनिल कासकर (नाटक- झेंडा रोविला), द्वितीय पारितोषिक प्रशांत खंदारे (नाटक- मेला तो शेवटचा होता) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुनिल मळेकर (नाटक- पाकीट) व अक्षता सामंत (नाटक- ती रात्र), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे कविता जाधव (नाटक- मेला तो शेवटचा होता), श्रध्दा जोशी (नाटक- घात), स्वप्नाली पवार (नाटक- अशब्द), गुलाब लाड (नाटक- ना ते आपूले).

योगेश कदम (नाटक- लिअर ने जगावं कि मरावं ?), साहील कांबळे (नाटक- मेला तो शेवटचा होता), महेंद्र दिवेकर (नाटक- झेंडा रोविला), वैभव पिसाट (नाटक- अरे अरे बाबा) दि. २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर, २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १८ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सतिश पेंडसे, राम चव्हाण आणि प्राची गडकरी यांनी तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर, प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी पारितोषिक प्राप्त संघांचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker