पद्मशाली समाजातील उप वधूवरांनी आपले नावे नोंदवावीत – अडकटलवार
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : युनायटेड पद्मशाली संघमच्या मराठवाडा युवक संघटनेने आयोजित केलेल्या उप वध वर परिचय मेळाव्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विवाहयोग्य मुला मुलींनी नावे नोंदवावीत असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रोहीत अडकटलवार यांनी केले आहे.
नांदेड येथे राज्यस्तरीय उप वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन युनायटेड पद्मशाली संघमच्या मराठवाडा युवक संघटनेने केलेली आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रोहित अडकटलवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मराठवाडा अध्यक्ष जगन्नाथ बिंगेवार, युवक अध्यक्ष किशोर राखेवार व जिल्हाध्यक्ष उमेश कोकूलवार यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली असून. नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विवाहयोग्य उप वधू वरांची उपस्थिती व नावनोंदणी करण्यासाठी तालुकानिहाय दौरे आयोजित करण्यात येत आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील उप वधू वरांची नोंदणी असलेली आकर्षक स्मरणिकाही काढण्यात येणार असून त्याचे काम सुरु झाले आहे. राज्यभर जनजागृती करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी दौरे सुरु केले असून विवाहयोग्य वधू वरांची नावनोंदणी करण्याचे काम होत आहे. दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या या मेळाव्याची तर जोरदार तयारी होता तच आहे पण राज्यभर युनायटेड पद्मशाली संघमच्या बांधणीचेही काम करण्यात येत आहे.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना आपल्या पाल्यासाठी योग्य पात्रतेचा अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी उप वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मेळाव्याला उपस्थित राहून वधूवरांनी आपला परिचय तर द्यावाच पण मोठ्या प्रमाणावर नाव नोंदणी करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रोहीत अडकटलवार यांनी केले आहे.