ममदापूर येथील युवकाची गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या

New Bharat Times नेटवर्क
कुंडलवाडी :- शहरापासून जवळच असलेल्या ममदापूर येथील रहिवाशी तथा कुंडलवाडी शहरातील श्री जनरल स्टोअर्स चे मालक विनोद त्रिमुख शिवशेट्टे (वय २१) या युवकाचा शेळगाव जवळील गोदावरी नदीत पडून आत्महत्या केल्याची घटना दि.१४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे.
कुंडलवाडी शहरातील डॉ.हेडगेवार चौकात गत वर्षभरापूर्वी विनोद शिवशेट्टे या युवकाने श्री जनरल स्टोअर्स या नावाने व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय आर्थिक मंदीत असल्याने विनोद याने आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून मिळाली आहे.याप्रकरणी कुंडलवाडीपोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत युवकाचे कुंडलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.सारिका अनमुलवाड यांनी शवविच्छेदन केले. मयत विनोद याच्यावर ममदापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकांने आत्महत्या केल्याने कुंडलवाडी शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.