पहलगाम घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : पहलगाम घटनेचे निषेध करत सर्व हिंदू धर्म संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली यावेळी खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याचची घटना घडली. भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेत 10 हून अधिक लोक जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला त्यामधील हल्लेखोरांनी पोलिसांच्या गणवेश घातले असल्याची बाब समोर आली आहे.
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्याचा संपूर्ण देशात निषेध करण्यात येत असून गुरुवारी हिदूत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भ्याड हल्लाचा निषेध करण्यात आला. या निदर्शनास खासदार अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व हिंदू संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.