ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

आरोग्य पतसंस्थेचा कर्मचारी नसलेला व्यक्ती करतोय आर्थिक हिशोबाची जुळवणी ; संचालक मंडळाचे तोंडावर बोट कानावर हात

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : नांदेड जिल्हा आरोग्य पतसंस्थेची निवडणूक अतिशय चुरशीची होत असल्याने सभासद व मतदार जागे झाले असून. मागच्या ३४ वर्षातील कारभाराचा हिशोब मागत असल्याने सत्ताधारी गटाची कोंडी झाली असताना आता पतसंस्थेचा कर्मचारी नसलेली व्यक्ती अर्थिक हिशोबाचे कामकाज पाहत असल्याने गोपनीयतेचा भंग होत आहे. असे असतानाही संचालक मंडळ तोंडावर बोट व कानावर हात ठेवून बसल्याने उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे.

जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या आस्थापनेवर कार्यरत नसलेल्या एका त्रयस्थ व्यक्तीने मागील अनेक वर्षांपासून पतसंस्थेचे सर्व अर्थिक व्यवहार राजेरोसपणे हाताळले आहेत. सदरील व्यक्ती गट सचिव या पदावरून आता नुकताच सेवा निवृत्त झाला असून या व्यक्तीने मागील अनेक वर्षांपासून दोन ठिकाणच्या नौकऱ्या सांभाळल्या आहेत.

एक स्वतःची नौकरी व एक पत्नीची नौकरी सांभाळली आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहण्याची किमया या जादुगाराने केली आहे. आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाला हि जादू समजली नाही की समजुन डोळेझाक केली हि ग्यानबाची मेख पतसंस्थेच्या सभासदांना कळण्यास मार्ग नाही.

सभासदांच्या सर्व अर्थिक व्यवहाराची माहिती या त्रयस्थ व्यक्तीला माहिती झाली आहे. वास्तविकपणे बॅंकिंग क्षेत्रात एखाद्या ग्राहकांच्या खात्यावरील अर्थिक व्यवहाराची माहिती इतरांना पुरवली जात नाही पण आरोग्य कर्मचारी पतसंस्थेत हा संकेत पाळण्यात आला नाही. हा प्रकार मागिल अनेक वर्षांपासून बिनबोभाटपणे सुरू आहे.

तसेच हा प्रकार पतसंस्थेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या सुद्धा लक्षात आला नाही हे विशेष आहे. या प्रकाराची माहिती विद्यमान संचालक मंडळाला माहीत असतानाही विद्यमान संचालक मंडळाने तोंडात मिठाची गुळणी का धरली हे न उलगडणारे कोडे आहे. या गंभीर प्रकरणी पुढे काय कार्यवाही होते हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker