ताज्या बातम्यानांदेडनायगांव

चोरीची वाळू वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांनी पकडला

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : चोरीच्या वाळूची बेकायदेशीरपणे वाहतूक करणारा टिप्पर नायगाव पोलीसांच्या तावडीत सापडला आहे. मात्र सदरचा टिप्पर पोलीसांच्या यादीतील नसल्याने टिप्परच्या विरोधात गुन्हा न नोंदवता तो दत्तात्रय उत्तम ढगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याने वेगळीच चर्चा होत तर आहेच. नायगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरिक्षक पंडीत यांनी माहिती घेण्यासाठी ठाण्यात गेलेल्या पत्रकाराशीच अरेरावीची भाषा वापरल्याने वरिष्ठांनी तत्काळ कानपिचक्या दिल्या त्यामुळे पंडीत यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.

नायगाव परिसरात मागील काही दिवसापासून मारतळा भागातील वाळू माफीया अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करुन विक्री करत होते. या अवैध वाळू विक्री करणाऱ्या माफीयांना महसूल विभागाचे पाठबळ मिळत असल्याने महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून वाळू माफीया अवैध वाळूचा गोरखधंदा सुरु केला आहे. या सर्व प्रकाराला शासकीय यंत्रणेचा पाठींबा असल्याने दररोज शासनाचे लाखो रुपयाचे माफीया नुकसान करत आहेत.

नायगाव पोलीस ठाण्याचे पथक फेरफटका मारत असतांना नायगाव शहरातील जिजाऊ चौकात MH 04 FU 2612 या क्रमांकाचा टिप्पर दि. 5 जानेवारी रोजी सायंकाळी दिसून आला. त्यामुळे पोलीस जमादार शंकर पवार यांनी टिप्पर थांबवून वाळू वाहतुकीचा परवाना मागितला पण चालकाने परवाना आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करत होता.

पोलिसांनी पोलीसी खाक्या दाखवण्याची तयारी करतातच वाळू वाहतूक परवाना नसल्याचे सांगितले. त्यामुळे नायगाव पोलीसांनी वाळूचा टिप्पर ठाण्यात लावला व दत्तात्रय उत्तम ढगे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करुन टिप्परसह ६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस जमादार साई सांगवीकर हे करत आहेत.

नायगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महसूल विभागाचे पितळ उघडे तर पडलेच पण हा टिप्पर पोलिसांनी का पकडला याचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नायगाव पोलीसांना प्रत्येक टिप्पर व हायवा मालक दर महिण्याला रक्कम देत असतो पण MH 04 FU 2612 या क्रमांकाचा टिप्पर पोलीसांच्या यादीतील नसल्याने कारवाई करण्यात आली असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker