ताज्या बातम्यानांदेडबिलोली

पथनाट्य स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

कुंडलवाडी : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त के.रामलू नाबाद नगराध्यक्ष सामाजिक ग्रुप तर्फे पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राथमिक गटातून सर्वप्रथम पारितोषिक कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी,
द्वितीय पारितोषिक सरस्वती ई-टेक्नो स्कूल कुंडलवाडी, तृतीय पारितोषिक जिल्हा परिषद हायस्कूल(उर्दू ) कुंडलवाडी उत्तेजनार्थ १) के.रामलू इंग्रजी मेडीयम स्कूल कुंडलवाडी, २) शाहू महाराज प्राथमिक शाळा कुंडलवाडी, ३) मिलिंद प्राथमिक शाळा कुंडलवाडी.

तर माध्यमिक गटातून सर्वप्रथम पारितोषिक कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार प्रा.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुंडलवाडी, द्वितीय पारितोषिक मिलिंद विद्यालय कुंडलवाडी, तृतीय पारितोषिक के.रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी, उत्तेजनार्थ पारितोषिक जिल्हा परिषद हायस्कूल कुंडलवाडी यांनी पटकाविले विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते सय्याराम मुकेरवार यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स.पो.नि ज्ञानेश्वर शिंदे तर प्रमुख अतिथी म्हणून साईनाथ उत्तरवार, माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार, माजी नगराध्यक्ष डॉ.एस.एस.शेगुलवार, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कुणाल पवारे, मुकेश जोशी, मा.नगरसेवक गंगाप्रसाद गंगोने, राम रत्नागिरे होते सुनील बेजगमवार यांच्याकडून विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व पेन बक्षीस देण्यात आले.

यात देशभक्तीपर गीत करण समेटवार व दत्तू हमंद यांनी गायले तर स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण डॉ.बोधनकर नरेश देविदास व सयाराम भोरे यांनी केले कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी अनिल पेंटावार, साई भोकरे, साई येपुरवार, रफत खान, लक्ष्मीकांत येपुरवार, दत्तू भोरे, सोनू सब्बनवार, शिवाजी तानुरे, शिव जायेवर आदी ने परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दत्तू हमंद यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker