89 नायगाव विधानसभाताज्या बातम्याराजकारण

डॉ.मिनल खतगावकरांनी भाजप पुढे निर्माण केले तगडे आव्हान

प्रकाश महिपाळे

नायगाव : भाजपसाठी अनुकूल असलेल्या नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. मिनल खतगावकर यांनी दमदार इंट्री केली आहे. विद्यमान आमदाराची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली असल्याने मतदारांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. डॉ.खतगावकर यांच्याकडे विकासाचे व्हिजन असल्याने मतदार संघाचा मुड बदलत आहे. मतदारांचा बदललेला मुड बघता भाजपा आमदार राजेश पवार यांच्या विरोधात आता काँग्रेसकडून डॉ.मीनल खतगांवकर यांचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

उमेदवारी अर्ज माघार घेतल्यानंतर दि. 5 नोव्हेंबर पासून विधानसभा निवडणुकीत रंगत येणार आहे. उमेदवारी दाखल करतांना काँग्रेस आणि भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले असले तरी भाजप उमेदवार आ.राजेश पवार यांनी सभेला गर्दी दाखवण्यासाठी तेलंगणातून माणसे आणली असल्याचा आरोप होत आहे. त्याच बरोबर त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती पुनम पवार यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्यासमोरच विरोधकावर टिका करतांना पातळी सोडून चिखलफेक केली तर आ.राजेश पवार यांनीही विकासावर बोलण्याऐवजी विरोधकांची उणीदुणी काढून त्यांना उचकावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

भाजपच्या व्यासपीठावरुन विरोधकावर चिखलफेक होत असतांना दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार डॉ. मिनल खतगावकर यांनी अतिशय मुद्देसुद भाषण करण्यावर भर दिला. डॉ. मिनल खतगावकर या उच्च शिक्षित असल्याने त्यांनी त्यांच्या शिक्षणाला शोभेल अशाच संयमी भाषेत विकासाचे व्हिजन मतदारांच्या पुढे मांडले. मतदारसंघात प्रचार करताना कुणावरच आगपाखड नाही पण प्रचारात अतिशय प्रभावी मुद्दे मांडत असल्याने तरुणाई प्रभावीत होत आहे. डॉ.खतगावकर यांनी प्रचाराचा झंजावात वाढवला असल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

नायगाव विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे पावरफूल नेता नव्हता ही संधी ओळखून भास्करराव पाटील खतगावकर यांनी पक्ष प्रवेश केला आहे. डॉ.मिनल खतगावकर यांना काँग्रेसकडून संधी उपलब्ध झाली आहे मिळालेल्या संधीचा त्यांनी सकारात्मक उपयोग सुरु आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार राजेश पवार यांच्या विरोधात नाराजीची मोठी लाट निर्माण झाली आहे. डॉ.मिनल खतगावकर यांनी प्रचारात आ. राजेश पवार यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण केले असताना शिवराज होटाळकर यांनीहीबंड करुन दंड थोपटले आहे. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker