ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

खाजगी सावकारी प्रकरणात पडलेली धाड दाबून टाकण्यातच अधिकाऱ्यांचा कल ; सहकार अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात!!


सौ.मीना भद्रे

धर्माबाद :- शहरातील एक खाजगी सावकारी करणारा व्यक्ती अवाच्या सव्वा व्याज वसूल करून पीडित अर्जदाराचे आर्थिक शोषण केले होते त्यानुसार अर्जदाराने या प्रकरणी सहकार अधिकारी यांच्या कर्यालयात रीतसर तक्रार दाखल केली होती त्यानुसार छापा मारण्यात आला पण मिळालेल्या आर्थिक मलिद्या मुळे हे प्रकरण दाबून केवळ कडे भर दिला असल्याची बोलल्या जात आहे.

पीडित अर्जदाराला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती पण पुन्हा एकदा धनशकती पुढे कायद्यास बगल देऊन कारवाईत ढील देण्यात आल्याचा प्रकार घडला की काय असा संशय हे प्रकरण पाहून निर्माण होत आहे.

शहरात स्वतःहून धाड टाकून खाजगी सावकारी चा पर्दाफाश करण्याचे अधिकार सहकार अधिकारी यांच्या कडे आहेत मात्र ते कधीच असे करत तर नाहीतच उलट कोणी धाडस करून तक्रार दाखल केली तर धाड टाकतात सगळयात महत्वाचे म्हणजे धाड टाकण्या पूर्वीच त्या धाडीची सगळी खबर त्या सावकाराला कळते मग हा गोपनियतीचा भंग होत नाही का? आणि हे कळवणारे कोण आणि एव्हढ सगळ पडद्या आड ठरवून केले जात असेल तर धाडीत मुद्देमाल किंवा रेकॉर्ड कसे सापडतील परिणामी खाजगी सावकारी करणारा मोकाट असतो आणि पीडित तक्रारदार मात्र त्रस्त असतात.

पैशाच्या देवाण घेवाण मधूनच असे प्रकार घडतात अवाच्या सव्वा व्याज दर आकारून जास्तीची लूट केली जाते त्यामुळे हे प्रकरण सहकार अधिकारी यांच्या कसे पोहचते
धाड टाकून जर तिथे मुद्देमाल किंवा पैश्याच्या देवाण ची तपशील सापडत नसतील तर धाडीचे महत्व काय उरेल आणि धनदांडगे सावकार कायद्याला कसे भितील ?

धर्माबाद शहरात धाड टाकून सहकार अधिकारी यांनी कार्यवाही सुरुवात केली पण त्यातून संबधीत खाजगी सावकाराला अनेक देण्यात आलेली ढील पाहता खाजगी सावकारी वर नियंत्रण आणण्यासाठी करवाई होती की केवळ प्रकरण दाबन्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाली याची शहरात वेगवेगळी चर्चा होत आहे.

सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून निर्माण होणारे प्रश्न सोडवावेत व कायद्याचे पावित्र्य कायम ठेऊन पीडित अर्जदारास न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker