ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी गजेंद्र मांजरमकर यांची नियुक्ती

कुंडलवाडी :- येथील पोलीस ठाण्यातील रिक्त असलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदी गजेंद्र मांजरमकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबत दि.२५ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील १८ पोलीस अमंलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली होती.

या सर्वांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील जिल्हा वाटप केले आहे. यात गजेंद्र मांजरमकर यांना नांदेड जिल्हा देण्यात आला होता. यानंतर जिल्ह्याची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी गजेंद्र मांजरमकर यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती केल्याचे आदेश दि.२५ फेब्रुवारी जारी केले आहे.

कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गत महिनाभरापासून पोलीस उपनिरीक्षक पद रिक्त आहेत तसेच अनेक वर्षापासून १८ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. दि.२५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांची कुंडलवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती केली आहे. कुंडलवाडी पोलीस ठाण्यातील उर्वरित रिक्त १८ पदे ही पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन तात्काळ भरावे अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker