ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांची भेट

◆जुन पर्यंत ग्रामीण रूग्णालय सुरू होणार असल्याची माहिती दिली

कुंडलवाडी :- कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरतीचा शासन निर्णय नुकताच जारी झाला असून पदभरती प्रक्रिया सुरू आहे. येत्या जून पर्यंत कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालय सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दिली. डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन इमारतीतील विविध कक्षांची पाहणी केली.

कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालयाची इमारतीचे बांधकाम पुर्ण होऊन दोन वर्ष उलटले तसेच ग्रामीण रुग्णालयाची यंत्र सामुग्री ही आली आहे.कुंडलवाडी शहर व परिसरातील आरोग्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ग्रामीण रुग्णालय कधी सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गत दोन वर्षापासून सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांना वेळोवेळी भेटून निवेदनाद्वारे पदभरतीसह ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली होती याची दखल घेत शासनाने दि.१३ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन निर्णय जारी करून पदभरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.झिने मँडम, चव्हाण सिस्टर, अश्विनी पाटील आदींनी कुंडलवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाला दि.२५ फेब्रुवारी रोजी भेट देऊन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीतील विविध कक्षांची व यंत्रसामग्रीची पाहणी केली.ग्रामीण रुग्णालयाच्या पदभरती बाबत शासन स्तरावर निर्णय झाला असून सध्या पदभरती सुरू आहे.येत्या जून पर्यंत कुंडलवाडी ग्रामीण रुग्णालय पदभरतीसह सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

डॉ.भोसीकर यांनी कुंडलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही यावेळी भेट दिली यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका अनमुलवाड यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker