ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नरसी बसस्थानकात पुन्हा मंगळसूत्र चोरी : नरसीत चोरटे चुस्त तर पोलीस सुस्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नरसी बसस्थानकात अगोदर झालेल्या चोरट्यांचा मागमूसही लागलेला नसतांना पुन्हा दि. २६ रोजी चोरट्यांनी मुखेड तालुक्यातील एका महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र चोरल्याची घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने बस तत्काळ नरसी पोलीस चौकीत आणली मात्र पोलिसांनी बसमध्ये कसलीही तपासणी न करता सोडून दिली व सदरील महिलेस रामतीर्थ पोलीस ठाण्यात जावून तक्रार देण्याचा सल्ला दिला.

गेल्या पंधरा दिवसापुर्वी हुनंगुदा येथील एक महीला नरसी बसस्थानकात मुखेड बसमध्ये चढत असताना पाकेट मारांनी सदर महिलेच्या गळ्यातील ५६ हजार किमतीची सात ग्राम सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली होती सदर महीलेनी या बाबत रामतीर्थ पोलिसात तक्रार दाखल केली होती तक्रार दाखल होऊन तपास मात्र जैसे थेच आहे. दि. २६ डिसेंबर रोजी चौत्राबाई किशन घोडके वय ५५ रा.बोमनाळी ता.मुखेड ह्या दुपारी १२ वाजता देगलुर आगारांच्या बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी सदर महिलेच्या गळ्यात असलेली एक तोळा सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली.

बसमध्ये आरडाओरड झाल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून बसचालकांनी सदर बस नरसी येथील चौकीत आणुन उभी केली. येथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बस मधील प्रवाशांची झाडाझडती न घेता बस पाठवून दिले व सदर महिलेस रामतीर्थ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगितले. येथील बसस्थानकात अनेक प्रवाशांचे पाकेट सोने चोरीच्या घटना वारंवार होत आहेत. तक्रार दाखल झाल्यानंतर रामतीर्थ पोलीस याकडे गांभिर्याने पाहत नाहीत.

तीन महीण्यापुर्वी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हाकेवर अंतरावर असलेल्या एटीएम मशीन कटरच्या साह्याने फोडून २० लाखाच्या वर नगदी रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले पण याही चोरीचा तपास लावण्यात रामतीर्थ ठाणे प्रमुखांना यश आले नाही. त्यामुळे या पोलीस ठाण्याला एका कर्तव्य दक्ष अधिका-यांची नेमणूक करून नरसी बसस्थानकात व इतर ठिकाणी झालेल्या चो-यांचा तपास लावावा अशी मागणी जनतेतून होत आहे. दि.२६ डिसेंबर रोजी नरसी बसस्थानकात झालेल्या चोरी बदल सदर महीलेनी रामतीर्थ ठाण्यात फिर्याद दिली का नाही हे मात्र कळू शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker