ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहर व परिसर अवैध धंदे मुक्त करणार

◆ सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांची पत्रकार परिषदेत माहिती

कुंडलवाडी प्रतिनिधी:- जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार ऑपरेशन व्हाँईट वॉश राबविण्यात येणार असून कुंडलवाडी शहर व परिसरातील अवैध धंदे पूर्णतः बंद करून शहर व परिसर अवैध धंदे मुक्त करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त कुंडलवाडी पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अविनाश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे.यानंतर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्हाभरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ऑपरेशन व्हाँईट वॉश राबविण्याचे आदेश जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला दिले आहेत.

त्यानुसार कुंडलवाडी शहर व परिसरातील अवैध धंदे पूर्णतः बंद करून शहर व परिसर अवैध धंदे मुक्त करण्यात येणार असून यासाठी ‘ आपरेशन व्हाँईट वॉश ‘ राबवण्यात येणार आहे. याच सोबत शहरी भागात मोहल्ला कमिटी व ग्रामीण भागात ग्रामरक्षक दलाची स्थापना करून कुंडलवाडी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या २ बीट व २७ गावांतील नागरिकांची व्हाट्सअप ग्रुप द्वारे कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात येणार आहे.

शहर व परिसरात तील अवैध धंदे, एखादी घटना,घडामोडी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व इतर कोणतीही माहिती पोलीस प्रशासनापर्यंत व्हाँटस अँप ग्रुपद्वारे मिळणार आहे. शहरी व ग्रामीण भागात अल्पवयीन मुले दुचाकी चालवित असल्यास यापुढेही कारवाई करण्यात येणार असून डॉ.हेडगेवार चौकात मंगळवार व शुक्रवार या आठवडी बाजाराच्या दिवशी वाहतूक पोलीसांची नियुक्ती करून वाहतुकीस अडथळा होणार नाही याची काळजी घेण्यात येईल असे यावेळी सहायक पोलिस निरीक्षक दीपक मस्के यांनी सांगितले.

याच पत्रकार परिषदेत पिंपळगाव येथील पोलीस पाटील शंकर गंगाराम पाटील साखरे हे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने कुंडलवाडी पोलीस ठाण्यात तर्फे सहायक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करून सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी शहरातील वृत्तपत्राचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker