दादांच्या राष्ट्रवादीत खतगावकरांचा पक्षप्रवेश निश्चित ; नरसीत लवकरच पक्ष प्रवेश सोहळा

मोरे मनोहर
किनारा :- सामान्य कार्यकर्त्याच्या प्रश्नाची जाण असणारा नेता म्हणून आज राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांच्याकडे महाराष्ट्रातील जनता पाहते म्हणून नांदेड जिल्ह्यात अनेक पक्षाची झालेली वाताहात पाहता राष्ट्रवादी पक्षातूनच आपण सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकतो असा विश्वास आमचा असल्याने राजाचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत.
नायगाव तालुक्यातील नरसी येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्यात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत आपली घडी बसवून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत काम करण्यासाठी शंकरनगर येथे झालेल्या कार्यकर्ता सहविचार सभेत पक्षप्रवेश करण्याचे निश्चित केले.
शंकरनगर तालुका बिलोली येथे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी बिलोली, नायगाव, उमरी, धर्माबाद, देगलूर, मुखेडसह नांदेड जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची सहविचार सभा दि. 6 मार्च रोजी शंकरनगर येथे आयोजित करण्यात आली होती या सहविचार सभेस माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.मिनल पाटील खतगावकर.
व्यंकटराव पाटील गोजेगावकर, सुरजितसिंग गिल, नागनाथ पाटील सांगवीकर, शिवराज पाटील होटाळकर, जिवन पा.घोगरे, अशोक पाटील मुगावकर, प्रवीण पाटील चिखलीकर, वसंत पा.सुगावे, स्वाती मराठे, धोंडीबा कांबळे, बाळासाहेब पाटील खतगावकर, सुरेखा पाटील,रवी पाटील खतगावकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना खतगावकर म्हणाले की मी व माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर एकत्र आल्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे बळ मिळणार आहे यासाठी
आपण सर्वांनी एकत्र येऊन नांदेड जिल्ह्यामध्ये अजित दादांची जी अपेक्षा आहे की पुढच्या विधानसभेला किमान आपले पाच आमदार नांदेड मधून निवडून गेले पाहिजेत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका यामध्ये आपला पक्ष नंबर एकचा पक्ष राहिला पाहिजे यासाठी आजपासून आपण कामाला लागू असे मत व्यक्त केले.
आ.प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की मी एका निवडनुक चिन्हावर दोनवेळा कधीच कोणत्याही निवडणुका लढविले नाही परंतु सामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर अनेक निवडणूका जिंकल्या ज्या प्रमाणे एखादी शिकार करण्यासाठी वाघाला दोन पावले मागे येवून झेप घ्यावी लागते त्याच प्रमाणे डॉमिनलताई खतगावकर ह्या देखील आपल्या वाघीण असुन त्यांचा नायगाव मध्ये झालेल्या प्रभावाचा बद्दला त्या घेतल्या शिवाय राहणार नाहीत. मी देखील माझ्या मुली प्रमाणे डॉ. मीनल पाटील यांचे राजकारणात योग्य पुनर्वसन करण्यासाठी मदत करीन असा विश्वास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी खतगावकर परीवारांना दिले.
यावेळी विश्वंभर पवार, गणेश सावळे, शिवचंद्र डांगे, ज्ञानेश्वर पाटील कदम विक्रम देशमुख शिवाजी धर्माधिकारी, गंगाधर भांगे, नंदू पाटील, श्रीपंत पाटील, स्वाती मराठे, सुरेश पा खंडगावकर, मंगल देसाई, संतोष पुय्यड,रजित हिवराळे, आनंदराव बिराजदार, विलास वानखेडे, माधवराव लोव्हाळे, सदाशिव पाटील, रमेश शेटकर, गणेश सावळे सह बिलोली, नायगाव, देगलूर, मुखेड सह जिल्ह्यातील कार्यक्रते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना दादांनी मीनल ताईच्या राजकीय पुनर्वसनासाठी राष्ट्रवादी पक्षात आपली योग्य घडी बसवावे असी अपेक्षा व्यक्त केले. या सहविचार सभेस हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.