कुंडलवाडी पोलीसांनी दोन दुकानातील चोरीचा गुन्हा ७२ तासांत केला उघड ◆चोरटा अल्पवयीन मुलगा

कुंडलवाडी :- शहरातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरील दोन दुकानात २ मार्च रोजी च्या मध्यरात्री चोरी झाली होती. ही घटना दि.३ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास दुकान मालक दुकान उघडण्यासाठी आले असता उघडकीस आल्यानंतर मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने फोडल्याने कुंडलवाडी पोलिसांसमोर चोरास पकडण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही दुकानातील चोरी प्रकरणाचा ७२ तासात गुन्हा उघड केला असून चोरटा अल्पवयीन मुलगा असून चोरट्याकडून चोरीतील ५८ हजार पैकी ५२ हजार १७६ रुपये जप्त करण्यात आले आहेत.
कुंडलवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मैनोद्दीन शेख यांचे भुसार दुकान व अब्दुल रहीम बाबा यांचे किराणा दुकान आहे.दररोजच्या प्रमाणे दोन्ही दुकाने बंद करून दोन्ही मालक घरी गेले होते. आज दि.३ मार्च रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे निदर्शनास आले.
चोरट्यांनी दुकान फोडल्यानंतर दुकानाचे कुलूप तोडून चोरी केल्यानंतर जसेच्या तसे कुलूप लावले. कुंडलवाडी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ गफूर शेख, पोहेकाँ क्षशंकर चव्हाण आदींनी घटनास्थळी भेट दिली होती.
या घटनेत मैनोद्दीन शेख यांच्या दुकानातील गल्ल्यातून ५० हजार रुपये नगदी व अब्दुल रहीम बाबा यांच्या दुकानातील ८ हजार रुपये असे एकूण ५८ हजार रुपये चोरीला गेले आहेत याप्रकरणी मैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुंडलवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
यानंतर कुंडलवाडी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्हीटीची पाहणी केली तसेच गुन्ह्यातील आरोपीची ओळख सीसीटीव्ही फुटेज द्वारे करण्यात आली.आरोपी हा शहरातील शतरंज गल्ली भागातील रहिवासी असून गुन्हा घडल्यानंतर आरोपी हा त्याच्या आईसोबत तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यातील पोतगंल येथे गेला होता.
कुंडलवाडी पोलिसांनी पोलीस अधीक्षक नांदेड येथील सामबर विभागाची मदत घेत आरोपीचे मोबाईल ची लोकेशन च्या आधारे निजामबाद जिल्ह्यातील बोकड येथे जात त्याच्या आईच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलाकडून चोरीच्या गुन्ह्यातील ५८ हजार पैकी ५२ हजार १७६ रुपये जप्त केले आहेत.आरोपी अल्पवयीन असल्याने नोटीस देऊन त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हि कामगिरी सहात्रक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोहेकाँ शेख गफुर, पोकाँ रघुवीरसिंह चौहान होमगार्ड सुरेश आशमोड, सुप्रिया बोलचटवार यांनी केली आहे.