क्राईमताज्या बातम्यानायगांव

तहसीलच्या प्रांगणातून पळवलेली हायवा नायगाव पोलिसांनी केली जप्त : आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : अवैध रेतीची वाहतूक करतांना महसूल विभागाने पकडलेली हायवा रेती माफीयाने तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून दि. 5 मार्चच्या रात्री उशिरा पळवली होती. या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पळसगाव शिवारातून ही हायवा जप्त केली व दोन्ही आरोपी अटक केले. दोन आरोपींना कनिष्ठ न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बरबडा मंडळाच्या वादग्रस्त मंडळ अधिकारी शितल स्वामी यांच्या खाबुगिरीमुळे बरबडा परिसरात अवैध रेतीचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात फोफावला असून. दररोज शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचे काम माफीया करत आहेत. पण दि. 5 मार्च रोजी बरबडा येथील नागरिकांनीच चोरीच्या रेतीच्या दोन हायवा पकडून दिल्या होत्या. मात्र मंडळ अधिकारी स्वामी या उशिराने पोहचल्यामुळे एक हायवा जाग्यावरुनच पळून गेली तर दुसरी चक्क महसूल विभागाने पकडल्यानंतरही तहसील कार्यालयाच्या प्रांगणातून दि. 5 मार्चच्या रात्री उशिरा माफीयांनी एम एच 26/ बी ई 1614 पळवून नेली.

या घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांनी या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात हायवासह चालक माणिका उर्फ अजय देविदास मोरे व मालक लोकडो भगवान मोरे या दोघांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. पळवून नेलेली हायवा सापडू नये यासाठी आरोपींनी नायगाव पोलिसांना गुंगारा देण्याचा बराच प्रयत्न केला मात्र स्थानिक बिट जमादार साई सांगवीकर यांनी आरोपीचा पाठपुरावा करुन पळसगाव शिवारातून हायवा तर जप्त केले च पण आरोपी हायवा मालक लोकडो मोरे व चालकास पोलीसी खाक्या दाखवून अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना नायगाव येथील कनिष्ठ न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी माणिका उर्फ अजय देविदास मोरे व मालक लोकडो भगवान मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर घटनेचा तपास साई सांगवीकर हे करत आहेत. नायगाव तालुक्यात रेती माफीयांच्या मुसक्या आवळण्यासाठी गंभीर गुन्हे नोंद करण्यात आले असले तरी चोरीच्या रेतीला मात्र आळा बसत नसल्याने याच्या मुख्य सुत्रधाराचा शोध घेणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker