ताज्या बातम्यानांदेडनायगांव

अँट्रासिटीच्या गुन्ह्यातील आरोपी बारा दिवसानंतरही मोकाटच ; तक्रारदार महिला भितीच्या सावटाखाली

प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव : घर विक्री केलेले पैसे मागण्यांसाठी गेलेल्या मातंग समाजाच्या महिलेला जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केल्या प्रकरणी दि. २० मार्च रोजी नायगाव पोलीस ठाण्यात सहा लोकांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र सदर प्रकरणातील आरोपींना अटक करण्याचे धारिष्ट्य नायगाव पोलीस दाखवत नसल्याने गुन्हा नोंद झाल्याच्या बारा दिवसानंतरही आरोपी मोकाटच फिरत आहेत. आरोपी मोकाट असल्याने गुन्हा नोंद केलेली महिला भितीच्या सावटाखाली वावरत आहे.

नायगाव शहरातील सुंदर नगरमध्ये राहणाऱ्या द्रौपदा जाधव या महिलेचा पती श्रावण जाधव यांचे चौदा वर्षापूर्वी निधन झाले. तेव्हापासून सदर महिला ही शिलाई काम करुन आपला उदरनिर्वाह करते. तिच्या वैयक्तिक अडचणीमुळे सदर महिलेने सुंदर नगर येथील मालकी घराची ३५ लाखाला विक्री केली असून सौदा चिठ्ठीच्या आधारे घर अरुण बालाजी धुमाळ रा.औराळा यांच्या ताब्यात दिले.

सौदाचिठ्ठी नुसार घराचे ३५ लाख रुपये देण्याची मागणी वारंवार केली असात धुमाळ यांनी आज उद्या आज उद्या म्हणून टाळाटाळ चालवली. त्यामुळे दि. १९ मार्च रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान धुमाळ यांच्या घरात जावून मला माझे पैसे द्या अन्यथा घर परत द्या अशी म्हणाले असता अरुण धुमाळ, श्याम शिंदे, अविनाश धुमाळ, अजय धुमाळ यांनी सदर महिलेला धरुन ठेवले तर सारिका धुमाळ व शकुंतला धुमाळ यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली.

झालेल्या मारहाण प्रकरणी द्रौपदा श्रावन जाधव या महिलेने नायगाव पोलीस ठाण्यात दि. २० मार्च रोजी तक्रार दिली. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार वरील सहा लोकांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. मातंग समाजाच्या महिलेला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद होवून १२ दिवसाचा कालावधी झाला पण परंतु आजपर्यंत आरोपी नायगाव पोलिसांना सापडले नाहीत.

पिडीत महिला न्यायासाठी मागच्या दहा दिवसापासून पोलीस ठाण्याचे उंबरवठे झिजवत आहे.मा मारहाण केलेले आरोपी सापडत नाहीत. अट्रासिटी सारख्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट असल्याने तक्रारदार महिला भितीच्या सावटाखाली वावरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker