ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द : जात वैधता सादर न करणे भोवले

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या नायगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे तालुक्यातील ५३ गावच्या ९७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी पारित केले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सदस्यत्व रद्द झालेल्यात अनेक सरपंचाचा समावेश आहे.

नायगाव तालुक्यात २०२१ मध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या होत्या या निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. मात्र राज्यातील कोव्हीड-१९ च्या पार्श्वभुमीवरील निर्बंधामुळे विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांनी जात पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सक्षम अधिका-यास सादर करण्यासाठी पहिल्यांदा १७ जानेवारी २०२२ व नंतर १७ जानेवारी, २०२३ अशी मुदत दिली होती.

ज्याअर्थी, शासनाने उक्त प्रमाणे संधी देवुनही विहीत मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत म्हणुन प्रतिवादी यांना नोटीसी देवुन दिनांक २६/१२/२०२४, १५/०१/२०२५ १४/०२/२०२५ व दिनांक २५/०२/२०२५ रोजीची या कार्यालयाची नोटीस प्रतिवादी सरपंच/सदस्य यांचेवर बजावून सदर दिवशी सुनावणी घेण्यात येवुन त्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची वारंवार संधी उपलब्ध करुन देण्यात आली. प्रस्तुतांनी राखीव जागेवर निवडूणआलेले विहीत मुदतीतील जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी नायगाव तालुक्यातील ५३ गावच्या ९७ सरपंच व सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास कसूर केल्यामुळे, त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करुन पुढील कालावधीसाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य म्हणुन राहण्यास अनर्ह ठरविले आहे. अपात्र ठरलेल्या सदस्यामध्ये आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर ८ ते १० सरपंच झालेल्यांचा समावेश आहे.

सदस्यत्व रद्द झालेल्या गावांची यादी…
गडगा -१, मोकासदरा -४, मांजरमवाडी -२, कोलंबी-१, कुंटूर -१, निळेगव्हाण -३, कुष्णूर – १, गोदमगा – १, रानसुगाव -२, ताकबिड -४, हुस्सा -४, राहेर -२, डोंगरगाव -१, धुप्पा -१, खंडगाव -२, गोळेगाव-नायगाव वाडी -३, सोमठाणा -३, धनंज – १, बरबडा -१, घुंगराळा -२, सावरखेड -१, मरवाळी तांडा -१, मरवाळी-कोपरा-२, पळसगाव-टाकळगाव -३ देगाव – २, नरसी -३ बेटकबिलोली -२, हंगरगा -१, आलुवडगाव -१, रातोळी -२, इकळीमोर -२, मुस्तापूर -१,पिंपळगाव -३, खैरगाव -६, मेळगाव -३, इज्जतगाव -१, बळेगाव -३, इकळीमाळ -१, सांगवी -१, कहाळा बु.-१, मांडणी -१, भोपाळा -१, कांडाळा -२, टाकळी त.मा.- २, मुगाव-मुगाव तांडा -१, अंतरगाव -१, टेंभुर्णी -२, वंजरवाडी -१, कोठाळा -१, औराळा -२, सुजलेगाव -३.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker