कुंटुरकर साखर कारखान्याचे वैभव म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी व कामगार : चेअरमन राजेश देशमुख कुंटुरकर
कुंटुरकर शुगरचा १२ वा गळीत हंगाम ; बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न… २०२६-२७ च्या हंगामात ५ लाख टन गाळप आणि २ कोटी युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट

New Bharat Times नेटवर्क
नायगाव: “कुंटुरकर साखर कारखान्याचे खरे वैभव हे या भागातील ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखान्याचे कामगार-कर्मचारीच आहेत. कारखान्याची आर्थिक कार्यक्षमता वाढवण्यासाठी येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप होण्यासोबतच त्याचे तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापूर्ण परिणाम मिळाले पाहिजेत. त्यासाठी कारखान्याच्या शेतकी आणि तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी आहे. उत्पादन वाढीसोबतच उत्पादकता वाढवण्यासाठी सर्व कामगारांनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन कुंटुरकर कारखान्याचे चेअरमन राजेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांनी केले.

नायगाव (खैरगाव) तालुक्यातील कुंटुर येथील ‘कुंटुरकर शुगर अँड ॲग्रो प्रा.लि.’च्या १२ व्या (२०२६-२०२७) ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता पार पडला. या सोहळ्याच्या प्रारंभी सौ. मधुमतीताई व राजेश गंगाधरराव देशमुख यांच्या हस्ते बॉयलरची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर चेअरमन राजेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर, संचालिका सौ. मधुमती राजेश देशमुख, रूपेश गंगाधरराव देशमुख कुंटुरकर, अंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर, वसंत पाटील सुगावे आणि उद्धवराव पतंगे देशमुख यांच्या शुभहस्ते बॉयलरचे अग्निप्रदीपन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कारखान्याचे जनरल मॅनेजर टी. एस. भालेराव यांनी मागील वर्षापेक्षा यंदा जास्तीत जास्त गाळप करून देण्याची जबाबदारी सर्व कामगार व कर्मचारी निष्ठापूर्वक पार पाडतील, असे सांगितले. तर ॲड. ज्ञानेश्वर मोरे यांनी आपल्या भाषणात कारखान्याच्या सुरुवातीपासूनचा इतिहास सांगत, नायगाव तालुक्यातील पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना ‘कामधेनू’ ठरला असून चेअरमन राजेश देशमुख कुंटुरकर यांनी तो यशस्वी करून दाखवल्याचे नमूद केले.
आपल्या भाषणात पुढे बोलताना चेअरमन राजेश देशमुख म्हणाले की, कारखान्यातील बहुतांश कर्मचारी हे परिसरातीलच रहिवासी आहेत. कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातून जास्तीत जास्त ऊस कारखान्यातच आला पाहिजे. ऊस गाळप वाढल्यास विजेचे उत्पादनही वाढेल. गेल्या वर्षी कोजन प्रकल्प यशस्वी झाला असून, भविष्यात इथेनॉल व सीबीजी (CBG) प्रकल्पांतूनही उत्पादन वाढवता येईल. कामगारांना गेल्या वर्षीच्या कामाची बक्षीस रक्कम दिवाळीला लवकरच वाटप करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. तसेच, यंदा गणपती, नवरात्र व दसऱ्याच्या काळात कमी पावसामुळे दुष्काळाचे सावट असल्याने जनतेच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत नाही. अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर व व्यापाऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून योग्य मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कै. गंगाधररावजी देशमुख साहेबांच्या प्रेरणेतून चालणाऱ्या या कारखान्याने नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्याचे अर्थकारण बदलण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु ऊसाचे क्षेत्र कमी असल्याने मर्यादा येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत नवीन तंत्रज्ञान (AI) व यांत्रिकीकरणाला महत्त्व देऊन शेतीत प्रयोग करावेत. ऊस हे शाश्वत आणि एकरकमी मोबदला देणारे पीक आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ५० किमी अंतरातील शेतकऱ्यांनी ऑक्टोबर ते जानेवारी दरम्यान लागवड करावी. येत्या काळात १५० गावांना स्वतः भेटी देऊन ऊस शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या धोरणानुसार १५ ऑक्टोबर २०२६ रोजी गळीत हंगाम सुरू होत असून, ५ लाख टन गाळप व २ कोटी युनिट वीज निर्यातीचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफ.आर.पी. (FRP) दिली जाईल आणि बांधावर एक टिपरूही शिल्लक राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी सुयाजी पाटील जाधव, संजय आनेराय शेळगावकर, दत्तराम धर्माधिकारी बरबडेकर, ॲड. ज्ञानेश्वर मोरे, मारोतराव पाटील कदम कुंटुरकर, निलेश देशमुख रुईकर, आनंदराव पाटील मोरे देगावकर, परबतराव जाधव कृष्णुरकर, गजानन जुने कोकलेगावकर, प्रल्हादराव पाटील सातेगावकर, माधवराव पाटील दुगावकर रुईकर, उद्धवराव नरवाडे, व्यंकटराव मोरे मोरईकळी, यदुराज जाधव सातेगावकर, गणपतराव डोईफोडे हुस्सा, सुधाकर पाटील डोंगरगावकर, लक्ष्मणराव शिंदे रुईकर, असनाजी पवार हातणी, मोहनराव पाटील मेळगावकर, गोविंदराव पाटील हुस्सेकर, बाबूराव पाटील सालेगावकर, मारोतराव पाटील पांढरे, हणमंतराव पाटील मेळगावकर, देविदास पाटील सातेगावकर, हरी पाटील सातेगावकर, भगवानराव डांगे कोटाळा, बालाजीराव पवार, पंजाब पाटील जाधव, पत्रकार सुनील रामदासी, दत्तात्रेय संगेवार आणि जगन झंपलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनरल मॅनेजर टी. एस. भालेराव, चीफ इंजिनिअर कदम साहेब, चीफ अकाउंटंट आनंद जाजू, शेतकी अधिकारी सतीश देशमुख, उत्तम वंगलवार, उत्तम मोरे, अनिल कदम, विश्वजित क्षीरसागर, विक्रमसिंह चव्हाण, शंकर जाधव, गोविंद जाधव, शंकर पांचाळ, योगेश पतंगे, पुंडलिक कदम, पी. जी. सूर्यवंशी, आर. जे. अडकीने, एस. एम. केंद्रे, करीम साब, विठ्ठलराव ढगे, हरी पाटील डोईफोडे, वसंतराव पाटील शिंदे, विकी पाटील कदम, भास्कर पाटील कदम, हणमंतराव हाणवते, साहेबराव हाणवते, नितीन देशमुख, हरिश्चंद्र पवार आणि कंत्राटदार संजय गिते आदींनी परिश्रम घेतले.



