नायगाव : आरक्षणाची टक्केवारी ५० टक्केच्या वर गेल्यामुळे नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत दि. २२ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात दुसऱ्यांदा काढण्यात आली. या सोडतीत ओबीसीच्या आरक्षणाला दोन जागांचा फटका बसला तर सर्वसाधारण प्रवर्गाला दोन जागांचा फायदा झाला. नायगाव तालुक्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू असलेली नरसी, बरबडा, कुंटूर, राहेर व ताकबीड ही गावे ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापितांना धक्का बसला तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटलेल्या मांजरम, घुंगराळा, कोलंबी, गडगा, कुष्णूर व टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या लढती चुरशीच्या ठरणार आहेत.
नायगाव तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ८० ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि. १ जुलै २०२५ रोजी नायगाव तहसील कार्यालयात काढण्यात आली होती. यात अनुसूचित जातीचे आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात काढण्यात आल्याने अनु. जातीसाठी १७, अनु. जमाती ४, ओबीसी २१ तर सर्वसाधारण ३८ असे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.
मात्र या आरक्षणाच्या सोडतीत आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच्या वर गेल्याने दि. २२ सप्टेंबर रोजी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी अजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली तहसीलदार सौ. धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची दुसऱ्यांदा सोडत काढण्यात आली. यावेळी हंबर्डे व साईनाथ भंडारे यांचे विशेष परिश्रम होते. यात अनु. जातीसाठी १७, अनु. जमाती ४, ओबीसी १९ तर सर्वसाधारण ४० असे आरक्षण जाहीर करण्यात आले. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अनु.जाती व जमातीच्या आरक्षणाला कुठलाच धक्का लागला नाही पण ओबीसी आरक्षणाला दोन जागांचा फटका बसला असून सर्वसाधारण वर्गाच्या दोन जागा वाढल्या आहेत.
नायगाव तालुक्यातील आरक्षण सुटलेल्या गावाची खालीलप्रमाणे माहिती