बिलोलीत बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे काळी फीत बांधून निषेध
तहसीलदार व पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

जयवर्धन भोसीकर
बिलोली :- बदलापूर शाळेतील लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ बिलोली महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला काळी फीत बांधून तहसील समोर निषेध व्यक्त करून तहसीलदार व पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यात महाराष्ट्रातील बदलापूर, अंबरनाथ, नागपूर, अकोला, कोल्हापूर, लातूर, आदी ठिकाणी चिमुकल्या मुलीसह महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत,सदरील घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहेत.
या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 24 रोजी बिलोली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख शिवकुमार पाटील बामणे, यांच्या नेतृत्वाखाली तोंडाला काळी फीत बांधून तहसील समोर एक तास बसून निषेध व्यक्त करण्यात आले असून तहसीलदार व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड,शिवसेना तालुकाप्रमुख शिवकुमार पाटील बामणे, काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, मीनाक्षी भोसीकर, वलिओद्दीन फारुकी, आनंद गुडमलवार, अमरनाथ कांबळे, प्रकाश पोवाडे, इमरान पठाण, श्रीनिवास शिंदे, साजिद कुरेशी, अजमद चाऊस, नरेश जिठ्ठावार, शंकर पाटील कुरे, शेख मुख्यार,शेख सुलेमान, संदीप कटारे, सय्याराम निदाने, व्यंकट गुजरवार, सादिक पटेल, शेख सलीम, हनमंत पाटील कदम, सयाराम नामतेश,अशोक पाटील वानोळे, शंकर कोनेरवार, बाबुराव पाटील टोम्पे,शेख रशीद, केशव रानवळकर, प्रभाकर रेडी, बाबुराव सोनकांबळे,राजू सोनकांबळे, बंटी साठे, साईनाथ भोरे, रमेश गवते, दिगंबर लाडे, शेषराव वाघमारे, आदीसह मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.