क्राईमताज्या बातम्यानायगांव

आरोपी मागच्या दाराने पळाल्याने नायगाव पोलीसांची कारवाई संशयास्पद

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : नायगाव पोलिसांनी रविवारी दि.२५ रोजी सकाळी धाड मारुन २७० किलो मांस व एक जीवंत गोवंश असा ३ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. मात्र गोवंशाची कत्तल करणारे आरोपी अज्ञात दाखवल्याने हि कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून. नायगाव पोलीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

नायगाव व परिसरात गोवंशाच्या कत्तली या नियमितपणे होत आहेतच पण रविवारी दि.२५ रोजी नायगाव पोलिसांना जाग आली व सकाळी सकाळी धाड मारुन एक जीवंत गोवंश तर कत्तल करण्यात आलेल्या तीन गोवंशाचे 270 किलो मांस जप्त केले व सदरचा 3 लाख 30 हजाराचा मुद्देमाल दाखवण्यात आला. इथपर्यंत कारवाई झाली पण गोवंशाची कत्तल करणाऱ्यांना पोलिसांनी प्रत्यक्ष पाहीले असतांना त्यांना मागच्या दाराने पळ काढायला लावला. जे पळाले त्यांची नावे जे कारवाई करण्यासाठी गेले होते त्या सर्वांना माहीत आहेत. तरीही आरोपी अज्ञात दाखवण्यात आले.

आरोपी अज्ञात दाखवण्यामागे नायगाव पोलीसांचे काय गौडबंगाल आहे याची दबक्या आवाजात होत असली तरी ही कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गोवंशाची कत्तल करणारे आरोपी स्थानिक असून ते दररोजच गोवंशाचे मांस विक्री करतात पण या प्रकरणात अज्ञात आरोपी दाखवून खऱ्या आरोपींना जाणीवपूर्वक मोकळे सोडले असल्याचे बोलल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker