ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

आरोग्य पतसंस्था निवडणूक : परिवर्तन पॅनलचा वचननामा ठरतोय सभासदांचे आकर्षण…

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : नांदेड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्था निवडणूकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. परिवर्तन पँनलने अतिशय शिस्तबद्ध व सभसदांच्या हितासाठी पतसंस्थेच्या कारभारात दहा बदल घडविण्याची हमी देणारा वचननामा हिताचा जाहीर केल्याने तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तर दुसरीकडे ३४ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्यांना सभासदाच्या हितासाठी काय करतोय हेच सांगता येत नसल्याने ही परिवर्तन पँनलसाठी जमेची बाजू ठरत आहे.

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक यंदा अटीतटीची व चुरशीची होत आहे. कार जे सत्ताधारी मागच्या ३४ वर्षांपासून सत्तेत आहेत त्यांना सभासदाच्या हिताचा निर्णयच घेता आला नाही. केवळ विविध कामाच्या नावाखाली जमा रक्कमेचा घोळ घातला असल्याने नाराजी वाढत गेली आहे. त्यामुळे यंदा परिवर्तन पँनल निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे रणधुमाळीने वेग घेतला असून या निवडणुकीत सहभागी दोन पॅनल पैकी परिवर्तन पॅनलने आपला वचननामा प्रकाशित केला.

त्यात पतसंस्थेचा कारभार आँनलाईन व डिजिटल करून पारदर्शक करणे, इमारत निधीची कपात बंद करणे, विम्याच्या नावाने कपात केलेली रक्कम विमा उतरवण्यासाठी वापर करून सभासदांना विम्याचे बाॅंड सभासदांना देण्याचे वचन परिवर्तन पॅनलने दिलं आहे. सभसदांच्या हितासाठी पतसंस्थेच्या कारभारात दहा बदल घडविण्याची हमी देणारा परिवर्तनचा वचननामा आहे.

परिवर्तन पँनलने प्रचारात आघाडी घेण्याबरोबरच सभासदाच्या हिताचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असताना दुसरीकडे सत्ताधारी पॅनलने तर आपला जाहीरनामाच प्रसिद्ध केला नाही. सत्ताधारी पॅनलने फक्त आपल्या उमेदवारांची नावे व निशानी असलेले बॅनर व भिंतीपत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे सत्ताधारी पॅनलचा जाहिरनामा कोराच असल्याची चर्चा सभासदांमध्ये दिसून येत आहे. चौतीस वर्षे पतसंस्थेच्या सत्तेवर असलेल्या सत्ताधारी पॅनलला सभासदांना देण्यासाठी कोणतेही आश्वासन शिल्लक दिसून येत नाही.

सत्ताधारी पॅनलने नविन आश्वासन दिल्यास चौतीस वर्षांपासून सत्तेवर राहुन आपण काय केले हा प्रश्न सभासदांकडून विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पतसंस्थेचा मतदार परिवर्तन पॅनलने दिलेल्या वचननाम्यावर विश्वास ठेवतो कि सत्ताधाऱ्यांच्या कोऱ्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker