आरोग्य पतसंस्था निवडणूक : नारीशक्तीला तुच्छ लेखणाऱ्यांना मतदार जागा दाखवणार

अंकुशकुमार देगावकर
नांदेड : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असुन दोन पॅनल मध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. परिवर्तन पॅनलने नऊ महिलांना उमेदवारी देऊन नारी शक्तीचा सन्मान केला आहे तर सत्ताधारी पॅनलने फक्त चार महिलांना उमेदवारी देऊन नारी शक्तीला तुच्छ लेखले असल्याची भावना मतदार बोलुन दाखवत आहेत. सत्ता परिवर्तनाच्या इराद्याने परिवर्तन पॅनलने जिल्हा पिंजुन काढला आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी परिवर्तन पॅनलच्या महिला उमेदवारांनी तडजोडीसाठी एक पाऊल पुढे टाकले असतांना महिला उमेदवारांचा प्रस्ताव सत्ताधारी पॅनलने धुडकावून लावत नारी शक्तीला तुच्छ लेखले आहे अशी मतदारांमध्ये चर्चा आहे. यापुर्वी सुद्धा महिलांना त्यांच्या सभासदांच्या प्रमाणात पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले नसल्याचा इतिहास आहे.
या निवडणुकीत तिनशे अठ्याऐंशी मतदारांपैकी दोनशे सतरा म्हणजे पंचावन्न टक्के महीला मतदार असतांना या निवडणुकीत महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. या निवडणुकीत अनेक संघटना पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे