ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

परिवर्तन पॅनल सभासदांना एक कोटी रुपयांचा इमारत निधी नियमानुसार परत करणार

अंकुशकुमार देगावकर

नांदेड : नांदेड जिल्हा परिषद आरोग्य पतसंस्थेकडे नव्यानव वर्षासाठी लिजवर जिल्हा परिषदेची जागा उपलब्ध असुन त्यावर सुसज्ज प्रशस्त इमारत असतांनाही सभासदांकडून इमारत निधीच्या नावाने जमा करण्यात आलेले जवळपास एक कोटी रुपये परिवर्तन पॅनल विजयी झाल्यास पहिल्याच बैठकीत सभासदांना नियमानुसार परत करण्याची हमी देण्याचा निर्णय परिवर्तन पॅनलच्या नियामक मंडळाने (कोअर कमिटी) घेतला आहे.

आज रोजी पतसंस्थेकडे जवळपास एक कोटी रुपयांचा इमारत निधी उपलब्ध आहे. सभासदांच्या हितासाठी काम करीत असताना सभासदांकडून जमा करण्यात आलेला इमारत निधी नियमानुसार सभासदांना परत करणे गरजेचे आहे. इमारत निधीची कपात तात्काळ बंद करण्याचे वचन परिवर्तन पॅनलने दिलेल्या वचननाम्यात नमुद करण्यात आले आहे.

सभासदांना त्यांच्याकडून कपात करण्यात आलेल्या इमारत निधीच्या प्रमाणात म्हणजे जवळपास तिस हजार ते पन्नास हजार रुपये मिळणार आहेत. सभासदांची होणारी अर्थिक पिळवणूक थांबवण्याला परिवर्तन पॅनल प्राधान्य देणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker