नायगाव येथे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास शिक्षणाधिकारी माधव सलगर यांची भेट

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेड यांच्यातर्फे आयोजित वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास दि.२ जून पासून नायगाव येथील जिल्हा परिषद कन्या हायस्कूल येथे उत्साहात सुरुवात झाली. हे प्रशिक्षण १२ जून पर्यंत चालणार आहे.आज दि.४ जुन रोजी नांदेड जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती घेण्याबरोबरच विविध प्रश्न प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांना विचारले. प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती पाहून शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
या प्रशिक्षणात सुलभक म्हणून शेख मुजाहिद शेख फरीद, महेंद्र बुद्धप्पा, सचिन तेहरा, त्र्यंबक स्वामी, योगेश मेहरकर, किरणकुमार बायकेवार, फसीद शेख आदी जण सुलभक म्हणून काम पाहत आहेत. या प्रशिक्षणात उमरी, धर्माबाद, नायगाव, बिलोली या चार तालुक्यातील वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ६० व निवड श्रेणीसाठी ३५ असे एकुण ९५ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षण दररोज सकाळी ९:३० ते ५:३० या वेळेत देण्यात येत आहे.