किनवट तालुक्यातील दोन भ्रष्ट महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात

New Bharat Times नेटवर्क
किनवट : भ्रष्टाचार करण्यात पुरुष कर्मचारीच अग्रेसर नाहीत तर महीला कर्मचारीही मागे राहील्या नसल्याचा प्रत्यय मंगळवारी किनवट तालुक्यात आला असून चक्क दोन महिला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही भ्रष्ट महिला तलाठ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील तक्रारदार यांचे वडिलोपार्जित ७ एकर शेत आहे. त्यापैकी अर्धी शेती साडे तीन एकर तक्रारदार यांचे पत्नीचे नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तक्रारदार त्यांचे कामाचे अनुषंगाने तलाठी तेलंगे यांना भेटले असता, त्यांनी पथम चाळीस हजार रुपये व तडजोडी अंती १७ हजार रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार ता.२९ मे रोजी प्राप्त झाली होती.
पंचासमक्ष लाचमागणी पडताळणी केली असता, यातील तक्रारदार लोकसेविका तलाठी तेलंगे व तलाठी गवळी यांना भेटले. तलाठी तेलंगे यांनी तक्रारदार यांना तलाठी गवले यांना भेटा असे सांगून त्यांच्या कडे पाठविले.तेव्हा तलाठी गवले यांनी तक्रारदार यांची फाईल घेऊन तलाठी तेलंगे यांना दाखवून त्यांना बोलून परत आले व तेलंगे मॅडम ज्याप्रमाणे सांगतात त्याप्रमाणे करा असे म्हणाल्या
त्यानंतर तक्रारदार यांनी भाग्यश्री भीमराव तेलंगे व सुजाता शंकर गवळे यांना कामाचे विचारले असता, तेव्हा तलाठी तेलंगे म्हणाले की, त्यादिवशी सांगितले, त्यापेक्षा ३ हजार कमी केले. त्यावेळी तक्रारदार त्यादिवशी सतरा हजार म्हणले होते असे बोलले, तेव्हा तलाठी तेलंगे यांनी तलाठी गवळे यांची समक्ष अठरा हजार रुपये असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आता अठरा हजार आणू की सोळा हजार असे म्हणाले. तेव्हा तलाठी तेलंगे यांनी सोळा हजार असे म्हणून स्वतः साठी व तलाठी गवले यांच्या साठी लाचेची मागणी करून लाच स्वीकारताना मिळून आले आहेत.
आज दि. ३ जुन रोजी लाच स्वीकृती सापळा कार्यवाही आजमावली असता, तक्रारदार यांच्या कडून लोकसेविका तलाठी तेलंगे आणि गवळे यांनी लाचेची रक्कम १६ हजार रुपये स्वीकारताना रंगेहात मिळून आले आहेत.आरोपीचे अंग झडतीमध्ये एक Vivo कंपनी चा आणि एक relame कंपनी चा मोबाईल आढळून आला. तेलंगे यांच्या ताब्यातून नगदी ६ हजार ६२० रुपये आणि गवळे यांच्या ताब्यातून नगदी १८ हजार ८२० रुपये मिळून आले आहे.
आरोपी लोकसेवक यांच्या किनवट व नांदेड येथील राहते घराची घरझडती सुरू आहे. तलाठी तेलंगे आणि गवळे यांचेविरुद्ध पो.स्टे. किनवट येथे भ्र.प्र.अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई प्रशांत पवार,पोलीस उपअधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रिती जाधव, सहा. पोलीस उप निरीक्षक शेख रसूल,अरशद अहेमद खान, सयद खदीर व गजानन राउत यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.