ताज्या बातम्यानांदेडनायगांव

वेश्या व्यवसायासाठी महिला व मुली पुरवणारा शेख सोहेल रामतीर्थ पोलिसांना सापडेना

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : बिलोलीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राज बार येथील लाँजवर दि. 6 एप्रिल रोजी कारवाई करुन 6 परप्रांतीय मुलींची सुटका केली. यामुळे नरसी परिसरातील लाँजवर खुलेआम वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड झाले. मात्र महिला व मुली पुरवणारा शेख सोहेल रा. पनवेल यास अटक करण्यात आजपर्यंत रामतीर्थ पोलिसांना यश आले नाही. या सर्व प्रकाराला रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकाची ‘पाँकेट’ संस्कृती कारणीभूत असल्याची आता चर्चा सुरू झाली आहे.

मागील चार पाच वर्षांपासून नरसी येथे लाँजींगच्या नावाखाली प्रस्थापित व मातब्बर मंडळींनी चक्क वेश्या व्यवसायाची दुकानदारी थाटल्याने नरसी हे वेश्या व्यवसायाचे केंद्र म्हणून परिचित झाले आहे. नरसी परिसरात सहा ते ७ लाँजींग सुरु आहेत याचा फायदा आंबटशौकीनांना होवू लागला. थोड्या वेळात जास्त कमाई होत असल्याने लाँज चालकही खोल्या देवू लागले.

वेश्या व्यवसायातूनही बक्कळ कमाई होत असल्याने काही लाँज मालक लाँजवरच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ठेवू लागले तर काहीजन दलालामार्फत हा व्यवसाय सुरु केला. विशेष म्हणजे शालेय व महाविद्यालयीन मुली व महिलांना नासवण्याचा उद्योग राजरोसपणे सुरु असताना रामतीर्थ पोलीसांच्या हप्तेखोरीमुळे संरक्षण मिळत गेले आणि उघड उघड लाँज चालकांना पाठबळ देण्याचे काम करत आहेत.

देगलूर रोडवर असलेल्या राज बार अँड लाँजींग मध्ये परप्रांतीय मुलींना आणून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे आणि या गैरप्रकाराला रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे पाठबळ देत असल्याचे समजल्याने बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी शाम पानेगावकर यांनी दि. 6 एप्रिल रोजी छापा मारुन नाशिक, धारावी मुंबई, अहमदाबाद गुजरात, हैदराबाद व सिलुगुडी पश्चिम बंगाल येथील 6 परप्रांतीय मुलींची सुटका केली. पानेगावकर यांनी धमाकेदार कारवाई करुन रामतीर्थ पोलीसांच्या हप्तेखोरीचा पर्दाफाश केला.

सुटका करण्यात आलेल्या मुलींना पोलिसांनी वेश्या व्यवसायाबाबत विचारपूस केली असता पनवेल नवी मुंबई येथील शेख सोहेल यांच्या माध्यमातून आम्ही येथे आलो असल्याचे सांगितले. त्यामुळे शेख सोहेल यासही आरोपी करण्यात आले. सदरची घटना घडून 20 दिवसाचा कालावधी झाला पण वेश्या व्यवसाय करण्यासाठी महिला व मुली पुरवणारा शेख सोहेल यास रामतीर्थ पोलिसांनी अटक केली किंवा तो पोलिसांना आजपर्यंत सापडला नाही हे विशेष.

प्रकरण गंभीर असल्याने सदरच्या प्रकरणाचा तपास हा पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फतच करण्यात येतो आणि सदरचा तपास बिलोलीच्या पोलीस निरीक्षकाकडे देण्यात आला. पण ते आजपर्यंत इकडे फिरकले देखील नाहीत मात्र रामतीर्थ पोलिसांनी केलेल्या तपासाच्या कागदपत्रावर मात्र सह्या दिसून येतात.

या प्रकरणाच्या फिर्यादी या बिलोली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कमल विश्वनाथ शिंदे या असल्या तरी एफ आय आर नोंदवताना आरोपी सुटले पाहीजेत अशा मजकूर लिहीण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात रामतीर्थच्या ठाणेदारांनी चमडी बेच के दमडी कमवणाऱ्याकडून सुध्दा मोदक घेतले असल्याची आजही चर्चा सुरु असून एका खास दलालामार्फत हा व्यवहार झाला असल्याचाही आरोप होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker