ताज्या बातम्यानांदेडनायगांव

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नियमित सुरू राहणार – बालाजी बच्चेवार

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही नियमित सुरू राहणार असून बहिणीच्या खात्यात दरमहा पैसे मिळणार आहेत. सदर योजना ही लोकप्रिय होत असल्याने विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठले असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करुन महिला भगिनींना आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांसाठी महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. सदर योजनेतून शहरी व ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी या योजनेद्वारे दरमहा १ हजार ५०० रुपये त्यांच्या खात्यात टाकले आहेत. तसेच ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत अशा महिलाचे अर्ज पुर्ण करुन त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत.

सदर योजना ही नियमित सुरू ठेवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच सर्व महिलांना दरमहा नियमित पैसे मिळणार आहेत. आत्तापर्यंत नायगाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास 65 हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून नोंदणी केली आहे. विरोधक या योजनेबद्दल अफवा पसरवून गैरसमज निर्माण करत आहेत.

ही योजना लोकप्रिय होत असल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटसुळ उठले असून ते आफवा पसरवत आहेत. नायगाव विधानसभा मतदार संघातील महिलांनी काळजी करू नये व त्यांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker