वैचारिक अधिष्ठान पक्के ठेऊन स्पर्धा परीक्षा अभ्यास करावा:- राहुल कर्डिले

जयवर्धन भोसीकर
नांदेड :- वैचारिक अधिष्ठान पक्के करून आपली पाळे मुळ न विसरता स्पर्धा परीक्षा तयारी विद्यार्थ्यांना करावी म्हणजे यश मिळेल असे आवाहन नांदेड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी राहुल कार्डिले ias यांनी केले. आंबेडकरवादी मिशन येथे आयोजित upsc निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा तयारी कालावधी दीर्घ असतो त्यामुळे आपोआप बी प्लान तयार होतो.

स्वतच्या अनुभव विषयी विद्यार्थ्यांना दीर्घ मार्गदर्शन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. युपीएससी यशस्वी झालेले आंबेडकरवादी मिशन चे अतुल राजूरकर IPS, डॉ.प्रीतम भाले ips तसेच कंधार येथील ऋषिकेश पालीमकर IAS यांचा यावेळी भव्य सत्कार करण्यात आला. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची प्रेरणा आपल्या यश साठी महत्वची होती हाच आदर्श समोर ठेऊन आपण प्रशासक म्हणून कार्य करू असे प्रतिपादन याप्रसंगी डॉ.प्रीतम भाले यांनी केले.

अतुल राजूरकर यांनी दोन वेळा upsc यश मिळवले गेल्या वर्षी त्याना ips भेटले यावरही परत यश मिळवले, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करताना आंबेडकरवादी मिशन चे योगदान आणि मदत आत्यंतिक महत्वाची ठरल्याचे तसचे आपल्या आई वडिलांनाचा त्याग समर्पण आपल्या यशाचा गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कंधार येथील ऋषिकेश पालीमकर यांची ias पदी निवड झाली दीर्घ काळ संयम ठेऊन यश अपयश पचवत आपण यशस्वी झालो खाजगी आयुष्यात आपण विविध धर्म अंगीकार करत असलो तरी प्रशासन मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान वरच चालवले लागते हे आवर्जून त्यांनी स्पष्ट केले. चालू घडामोडी चे संदर्भ लक्षात ठेऊन अभ्यासक्रम अभ्यास केल्यास upsc यशस्वी होऊ शकता असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आंबेडकरवादी मिशन मधे दिल्ली येथील सुप्रसिद्ध next ias चे क्लास निशुल्क उपलब्ध आहेत अभ्यासिका वसतिगृह ग्रंथालय, आदी सुविधा सोबतच पूर्व परीक्षा उत्तीर्ण upsc विद्यार्थ्यांना दिल्ली येथे निशुल्क संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल असे याप्रसंगी दीपक कदम प्रमुख आंबेडकरवादी मिशन यांनी स्पष्ठ केले.
सत्कार समारंभ साठी डॉ.गोविंद नांदेडे पूर्व शिक्षण संचालक, कामाजी पवार राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, डॉ.प्रथ्वीराज तौर मराठी विभाग प्रमुख, उत्तम सोनकांबळे, डॉ.यशवंत चव्हाण, वी.डी.कोणाले, आर.बी.मादले, प्रा.प्रदीप रोडे, केशव जोंधळे, इंजी राजे पाटील, भगवान धबडगे, दिगंबर मोरे, गौतम कांबळे, गणेश सोंढरे, बालाजी कांटेवाड, जी सिद्धार्थ, श्रीसागर मामा, डॉ.प्राचार्य सावंत धम्मदीप, वेंकेट किडे पाटील.
सुशील चिकटे, भारत शिंदे, जयश्री कामाजी पवार, दैवशील गवंदे, करुणाताई तारु, डॉ.प्रतीक्षा तलंगकर, डॉ बी आम्रपाली, ऐश्वर्य चिकटे लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स, निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा आई वडील आणि मोठ्या प्रमाणावर पालक विद्यार्थ्यां या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .



