ताज्या बातम्यानांदेडनायगांव

भास्करराव पाटील खतगावकरांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमानी उत्साहात साजरा

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते माजी मंत्री तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंकरनगर (रामतीर्थ) तालुका बिलोली येथे नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील पुयड रामतीर्थकर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांचा हा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सामाजिक कार्याची जाण असलेले राजकारणातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व सामान्य जनतेच्या प्रश्नाची कशी सोडवणूक करावी याची जाण असणारे आणि महाराष्ट्रात सर्वात अधिक वयोवृद्ध निराधाराचे प्रश्न सोडवणारे एकमेव नेते भास्कररावजी पाटील खतगावकर हे असल्याने त्यांच्या कार्याची जाण ठेवून भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगाव मार्केट कमिटीचे संचालक संतोष पाटील पुयड रामतीर्थकर यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून रामतीर्थ प्राथमिक आरोग्य केंद्रात मानव विकास योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या गरोदर मातेच्या कॅम्प मधील उपस्थित सर्व गरोदर मातेंना आणि रुग्णालयातील रुग्णांना फळे व मिठाई वाटप करण्यात आले.

भटक्या समाजातील कित्येक कुटुंब आजही पाल घालून ऊन वारा पाऊस अशा अशा परिस्थितीत आपल्या पालामध्ये ते वास्तव्य करत असताना अजुनही पक्या घरापासून वंचित असलेल्या नागरिकांना त्यांच्या पालावर पावसापासून त्यांच्या पालाचे संरक्षण व्हावे या दूरदृष्टी कोणातून अशा कुटुंबीयांना त्यांच्या पालावर ताटपत्री टाकण्यासाठी अशा गरजू नागरिकांना ताटपत्र्या देऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यात आले.

यावेळी रामतीर्थ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ उज्वला डोंगरे, संतोष पाटील पुयड, सदाशिव पाटील डाकोरे, शिवाजी पाटील देगलूरे, यादवराव पाटील भेलवंडे, बळवंत पाटील वाडेकर,बाजीराव पाटील रोकडे, दादाराव पाटील पुयड, जगदीश पाटील वाडेकर, मारुती वाघमारे, ब्रह्मा कांबळे, आसिफ शेख, गंगाधर संकटे,गणेश रोकडे, साईनाथ देगलूरे, राघव पाटील योगे, अवधूत पाटील देगलूरे,श्रीकांत कांबळे, तुळशीराम गायकवाड कुंचेलीकर, राजाराम कांबळे, आजम शेख, विजय पाटील पुयड, शंकर हातीनगरे, माधव वाघमारे, संजय शेरे,नितीन कांबळे यासह प्राथमिक आरोग्य केंद्र रामतीर्थ येथील सर्व स्टॉप व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शंकरनगर येथे हिप्परगा माळ सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सदाशिवराव पाटील डाकोरे यांच्या वतीनेही भास्कररावजी पाटील खतगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शंकरनगर येथे मिठाई वाटप करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker