उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे काँग्रेस कडून जंगी स्वागत

अंकुशकुमार देगावकर
नांदेड – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर खा. रविंद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत, जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील पक्ष कार्यालय येथे हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली व माजी आ.तथा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. या निवडीनंतर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचे जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. शहरातील पक्ष कार्यालयापुढे जोरदार अतिषबाजी करण्यात आली.
यावेळी खा.रविंद्र चव्हाण, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार, प्रदेश सचिव सुरेंद्र घोडजकर, सरचिटणीस राजेश पावडे, श्याम दरक, दिलीप पाटील बेटमोगरेकर, अनिल मोरे, संजय बेळगे, श्रीनिवास मोरे, आनंद चव्हाण, संजय भोसीकर, महेश देशमुख तरोडेकर, बालाजी चव्हाण, गंगाधर सोंडारे, प्रफुल्ल सावंत, गंगाधर सोनकांबळे, डॉ.रेखा चव्हाण.
डॉ.करुणा जमदाडे, नशिम पठाण, सतिश देशमुख तरोडेकर, बापूसाहेब पाटील, माधवराव पवळे, गणेश ठगे, सुरेश हटकर, सत्यपाल सावंत, रावराव पाटील बेटमोगरेकर, निरंजन पावडे, महेश शिंदे, दिपकसिंग हुजूरिया, संजय वाघमारे, गगन यादव, अतुल पेदेवाड, शंकर शिंदे, अंबादास रातोळे, गणेश पाटील, गोविंद पाटील, शेख मुख्तार, नागराज सुलगेकर, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख बबन बारसे, महेश खेडकर, सुनील शिंदे, धनंजय उमरीकर, तुषार पोहरे, आदीसह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



