ताज्या बातम्यानांदेडनायगांव

सिक्युरिटी गार्ड ते महसूल सहायक : आनंद दासवाड यांचा प्रेरणादायी प्रवास

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : परिवाराची हालाखीची परिस्थिती असल्याने तालुक्यातील रुई (बु) येथील आनंद दत्ता दासरवाड हा युवक कुष्णूर येथील खाजगी कंपनीत सिक्युरिटीगार्डचे काम करत होता. रात्रीची नौकरी करतांना मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून देता अतिशय जिद्दने व मेहनतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा उतीर्ण होवून महसूल सहायक पदाला गवसणी घातली आहे.

ह्रदयात शिकण्याची उर्मी होती पण घरची परिस्थिती नव्हती. एकीकडे घर चालवायचे होते तर दुसरीकडे शिकण्याची जिद्द होती. या घालमेलीत नायगाव तालुक्यातील रुई बु. येथील तरुणाने कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील एका खाजगी कंपणीत वाचमनची नौकरी करण्यास सुरुवात केली. रात्रपाळीची नौकरी असली तरी त्याच्या डोळ्यात स्वप्न होत आणि सरकारी नौकरी आपल्या आवाक्याबाहेरची नाही हे तो.सतत आपल्या मनाला सांगत होता. इमारतीच्या समोर हातात काठी घेवून उभ राहत असला तरी आनंद दासवाड हा एक योध्दा होता आणि योध्दा कधी पराभूत होत नाही ते त्याने अथक परिश्रमाने सिध्द करुन दाखवले आहे.

वाचमनची नौकरी करत असताना लोक म्हणायचे लोक म्हणायचे, “रात्रभर ड्युटी करून अभ्यास कसा होईल ?” काही जण तर हसतही होते “सरकारी नोकरी ? तुझ्या आवाक्याबाहेरचं आहे रे!”पण त्याने ठरवलं होतं “माझं आजचं स्थान माझं भविष्य ठरवणार नाही.”रात्री इमारतीची ड्युटी आणि दिवसा अभ्यास.. झोप कमी, आराम नाही, चैन नाही. त्याच्या पाठीशी ना कुठली कोचिंग क्लास होती ना कोणाचं बळ. पण त्याच्या सोबत होती फक्त जिद्द, चिकाटी आणि स्वप्न पूर्ण करण्याची आग. ज्याच्या हातात बऱ्याच काळापर्यंत चहा आणि वॉचमनच्या वहीच्या नोंदी असायच्या, आज त्याच्याच हातात सरकारी नोकरीचं नियुक्तीपत्र आहे. हो, तोच वॉचमन…आता आहे “महसूल सहायक.”आज त्याने फक्त एक पद मिळवलं नाही, तर हजारो अशा संघर्ष करणाऱ्यांना एक संदेश दिला. पद नाही, तर जिद्द मोठी असते. परिस्थिति नाही, तर दृष्टिकोन महत्त्वाचा असतो.

स्वप्न कितीही मोठं असो, आणि परिस्थिती कितीही प्रतिकूल असो जर तुम्ही हार मानली नाही, तर यश तुमच्या पायाशी झुकायला लागतं हे सिध्द करुन दाखवल आहे आनंद दासवाड यांनी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker